सत्र १४३ – तन्वी अमित
विषय - मराठी कवितांमधून येणारी स्त्री
सर्वसाधारणपणे 'मनोव्यापाराला प्राधान्य' हे सर्व भारतीय कलाकृतींचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे ज्यावेळेस इतर संस्कृतींमध्ये दृश्य अगर मूर्त स्वरूपाला - म्हणजेच वर्णनात्मक गोष्टींना अथवा भावनांच्या शारीर प्रकटीकरणाला प्राधान्य दिलं जातं त्यावेळेस आपल्याकडच्या कलाकृती मात्र मनाची गुंतागुंत, घालमेल, आणि त्या अनुषंगाने येणारी विविध रूपे / रूपके यांच्या भोवती फिरतात असं कदाचित म्हणता येईल. मराठी कवितांच्या समृद्ध भावविश्वात दिसणाऱ्या स्त्री प्रतिमा हा आजचा शब्दांगणच्या सत्राचा विषय म्हणून खास.
सध्या नवरात्र चालू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे आदिशक्तीची उपासना सुद्धा. त्या अनुषंगाने आपल्यापैकी अनेक जण माझ्या जीवनातली स्त्री शक्ती या वर लिहिताहेत, आठवताहेत. शब्दांगण मध्येही आज एका अर्थाने जागर होईल. 'मराठी कवितांमधून येणारी स्त्री' हा विषय आज तन्वी अमित मांडणार आहेत. त्यांच्यासारखा संवेदनशील आणि अभ्यासू वाचक आज विषय मांडणार आहे ही आपल्या दृष्टीने अधिक आनंदाची गोष्ट. तेव्हा आजचं सत्रं चुकवू नका.. नक्की या.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !
No comments:
Post a Comment