२३।१२।२०२१
सत्र १५२
पुस्तक : Who Moved My Cheese?
लेखक: Spencer Johnson
सादरकर्त्या : झेलम वैशंपायन
जीवनातली सगळ्यात अवघड वाटणारी गोष्ट कोणती? तर बदलाला सामोरं जाणं. बऱ्याचदा बदलाच्या फळापेक्षा सुद्धा नुसता बदल स्वीकारणं हेच मोठं आव्हान वाटत राहतं. जागतिकीकरणाच्या युगात तर बदल स्वीकारणं अत्यंत आवश्यक बनलं आहे. अगदी रूढ अर्थाने काय करा नि काय करू नका हे सांगणाऱ्या सेल्फ हेल्प पुस्तकांच्या मालिकेतलं 'Who moved my cheese' हे पुस्तक नसलं तरी एकंदर जीवनाविषयी मार्मिक भाष्य करणारं हे पुस्तक आहे.शब्दांगणच्या आजच्या म्हणजे १५२ व्व्या सत्रात मुळात चांगली समुपदेशक असलेली, पण (की म्हणूनच?) मितभाषी असलेली झेलम वैशंपायन बोलणार आहे. म्हणून आजच्या सत्राची उत्सुकता अधिक. ऐकायला नक्की या.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
No comments:
Post a Comment