६/२/२०२०
सत्र ५७- सी. ए. जयंत करकरे
पुस्तक- रक्तलांछन
लेखक - श्री. सच्चिदानंद शेवडे
काश्मीर हा तुमचा आमचा सर्वांचाच जिव्हाळ्याचा विषय. मध्यंतरी कलम ३७० रद्द झालं तेव्हा तुम्हा आम्हाला काश्मीर जणू परत भारतात आल्याचाच आनंद झाला. संपूर्ण देशात आनंदाची लहर उठली. पण काश्मीर, पंजाब या राज्यांनी भोगलेल्या फाळणीच्या जखमा मात्र आपण सगळेच काहीसे विसरत चाललो आहोत. सुखापेक्षाही दुःख माणसांना / राष्ट्राला जोडतं. आपण एक असल्याची भावना निर्माण करतं. या जखमा लक्षात ठेवाव्यात कारण त्यातून राष्ट्रीयतेची भावना वाढीस लागते. आणि केवळ लक्षात ठेवण्यासाठी नाही तर ऐतिहासिक चुकांमधून शिकण्यासाठीसुद्धा इतिहासाचा अभ्यास लागतो. 'रक्तलांछन' या दोन्ही पातळीवर एक लक्षणीय पुस्तक. डॉ. सच्चिदानंद शेवडे हे प्रसिद्ध आहेत त्यांच्या हिंदुत्ववादी विचारांसाठी. त्यांचे जाज्वल्य विचार हे अभ्यासातून निर्माण झालेल्या श्रद्धेचं प्रतिक आहेत. प्रक्षोभक पुस्तक / विषय हाती घ्यायला अनेकजण कचरतात अशावेळेस डॉ. सच्चिदानंद शेवडे निर्भीडपणे कर्तव्य कठोर भूमिका मांडताना दिसतात. म्हणून त्यांची पुस्तके अधिक वाचनीय ठरली आहेत. अर्थातच पुस्तक आणि विषय दोन्ही स्पृहणीय.
आज 'रक्तलांच्छन' ही कादंबरी शब्दांगणच्या वाचकांसमोर मांडली आहे सी. ए. जयंत करकरे. आणि विशेष म्हणजे या सत्राला पुस्तकाचे लेखक, दस्तुरखुद्द डॉ. सच्चिदानंद शेवडे सुद्धा उपस्थित राहिले आहेत. आपल्या सर्वांच्या दृष्टीने ही पर्वणीच! आपल्याच इतिहासाकडे डोळसपणे पाहता यावं यासाठी डॉ. सच्चिदानंद शेवडे यांची पुस्तके नक्की वाचावी अशीच.
No comments:
Post a Comment