Friday, November 25, 2022

सत्र १९८ : १८५७चा उठाव - स्वातंत्र्यसमर, जिहाद की सत्तासंघर्ष : चैतन्य जोशी (उत्तरार्ध)

२४।११।२०२२

सत्र १९८ वे:

विषय : १८५७चा उठाव - स्वातंत्र्यसमर, जिहाद की सत्तासंघर्ष (उत्तरार्ध)

सादरकर्ते : चैतन्य जोशी



आजचं शब्दांगण चं सत्र मागच्या सत्राचा उत्तरार्ध आहे. मागच्या सत्रात चैतन्यने १८५७ च्या उठावाचा विस्तार, त्यातल्या घटना, त्यात सहभागी झालेले राज्यकर्ते, त्यांच्या भूमिका आणि त्यात सापडणारी संगती / विसंगती यांचा आढावा घेतला. आज च्या सत्रात आपला मूळ प्रश्न '१८५७ चा उठाव हा स्वातंत्र्यसमर , जिहाद की सत्तासंघर्ष ' या प्रश्नाचा उलगडा होणार आहे. नानासाहेब पेशव्यांच्या सहभागाविषयी आपण काही वेगळ्याच गोष्टी मागच्या सत्रात ऐकल्या. त्यामुळे आजच्या सत्रातही याबद्दल काय मांडणी चैतन्य करतोय याची उत्सुकता आहे. तुम्हालाही असेल. नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Thursday, November 17, 2022

सत्र १९७ : १८५७चा उठाव - स्वातंत्र्यसमर, जिहाद की सत्तासंघर्ष : चैतन्य जोशी (पूर्वार्ध)

१७।११।२०२२

सत्र १९७ वे:

विषय : १८५७चा उठाव - स्वातंत्र्यसमर, जिहाद की सत्तासंघर्ष (पूर्वार्ध)

सादरकर्ते : चैतन्य जोशी



याचसाठी केला होता अट्टाहास! असं वाटावं असं आजचं शब्दांगण चं सत्र. चैतन्य जोशी आजचं सत्र घेतोय. खूप वेळा आपण पुस्तकावर सत्र घेतो, ऐकतो. पण एखाद्या विषयावर सत्र घेण्यासाठी त्या विषयाचा वक्त्याने अभ्यास करावा ४ -५-६ पुस्तक वाचावीत आपलं मत त्यातून तयार करावं आणि सत्र घ्यावं हे विशेष. चैतन्य अशी मेहनत घेऊन आजचं सत्र घेतोय आणि म्हणून हे सत्र महत्वाचं. विषयही महत्वाचा. १८५७ चा उठाव हे स्वातंत्र्यसमर, जिहाद की सत्ता संघर्ष असा विषय आहे आजच्या सत्राचा. सत्र छान होईल हे नक्कीच! नक्की ऐका !!


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


Saturday, November 12, 2022

सत्र १९६ : एक शून्य मी - पु.ल.देशपांडे : शौनक पिंपुटकर

१०।११।२०२२

सत्र १९६ वे:

पुस्तक : एक शून्य मी

लेखक : पु.ल.देशपांडे

सादरकर्ते : शौनक पिंपुटकर 



मंडळी, पुलंची जयंती परवाच म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी साजरी झाली. खूप जणांना पुलं म्हणजे कथा कथन एव्हढेच माहीत असते. अशांसाठी आजचं सत्र म्हणजे मेजवानीच जणू. कारण पुलंना दैवत मानणारा शौनक आजचं सत्र घेतोय ते ही 'एक शून्य मी' या पुस्तकावर .... आजचे सत्र दवडू नका! उजळणी साठी किंवा पुनर्प्रत्ययासाठी!


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र १९५ : संवादविश्व : अरविंद विंझे

०३।११।२०२२

सत्र १९५ वे:

विषय : संवादविश्व

सादरकर्ते : अरविंद विंझे



मंडळी, आज शब्दांगण चं सत्र १९५. आजच्या शब्दांगणच्या सत्राचा विषयच खास. अरविंद विंझे  'संवाद विश्व ' यावर आजचं सत्र घेतायत. खरंतर माणसाचं माणूसपण कशात तर त्याच्या संवाद साधू शकण्याच्या क्षमतेत असं सहजच म्हणता येईल.  तंत्रज्ञानाने संवादाच्या पद्धतीमध्ये बदल केलेले असतील पण त्याची गरज मात्र कधी नव्हे एवढी वाढलेली आहे. केवळ भाषा आली / कळली म्हणजे संवाद होऊ शकतो असे नाही हे खरेच आणि त्याच वेळी भाषेविण संवाद होऊ शकतो असे ही आपण पाहतो. संवाद म्हणजे नेमकं काय, संवाद प्रक्रियेचा इतिहास, संवादाचा अर्थ, त्याची प्रक्रिया, संवादाचे प्रकार, संवादाची साधनं या सर्वांचा एक आढावा आज अरविंद विंझे घेतायत. त्यांची बहुश्रुतता, रसिकता आपण जाणतोच. आजच्या सत्राची म्हणूनच उत्सुकता अधिक आहे. ऑनलाईन सत्र आहेच पण संवादावर संवाद साधण्यासाठी या सत्राला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यात अधिक मजा आहे.

नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

सत्र १९४ : अपरिचित साहिर : गणेश मनोहर कुलकर्णी

२७।१०।२०२२

सत्र १९४ वे:

विषय : अपरिचित साहिर

सादरकर्ते : गणेश मनोहर कुलकर्णी 



साहिर लुधियानवी हे नाव आपल्या कानावर पडलेलं असतं. लिखाणातून, गाण्यांमधून, अमृता प्रीतमच्या उल्लेखातून साहीर भावलेला असतो. पण "मै पल दो पल का शायर हुं" म्हणणारा साहिर शायरीच्या पल्याड कसा होता, त्याच्या माणूसपणाचे कंगोरे कोणते हे आपल्या समोर आणणारं आजचं सत्र! कवीच्या आतून वाहणाऱ्या झऱ्यांनी त्याची कविता शब्दात पाझरत जाते. ह्या झऱ्याचा मागोवा म्हणजे हे सत्र! निसर्गप्रेमी, चोखंदळ वाचक, उत्तम वक्ते आणि लेखक असणारे  गणेश मनोहर कुलकर्णी मांडत असलेली शायराची कथा नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र १९३ : महाभारत कालनिर्णय (उत्तरार्ध) : वासुदेव कोल्हटकर

२०।१०।२०२२

सत्र १९३ वे:

विषय : महाभारत कालनिर्णय (उत्तरार्ध)

सादरकर्ते : वासुदेव कोल्हटकर 



मंडळी, आजच्या शब्दांगणच्या सत्राची आठवण करून द्यायला हा संदेश. मागच्या सत्रात वासुदेव कोल्हटकरांनी कालगणना - त्यावरचे समज गैरसमज अशा विषयांवर चर्चा केली. आज सत्राचा उत्तरार्ध - पण खरे तर मुख्य भाग संपन्न होईल. महाभारताचा काळ नक्की कोणता असावा आणि त्याबद्दल आज प्रचलित असलेली मत - मतांतरांचा विचार आजच्या सत्रात होणार आहे. मागचे सत्र एका अर्थाने तांत्रिक असूनही रंजक झाले होते. आजच्या सत्रात तर प्रत्यक्ष महाभारत कधी घडले याचा काळ नक्की कोणता यावर चर्चा होईल. आपण सर्वांसाठीच महाभारत हा औत्सुक्याचा विषय आणि आपल्या संस्कृतीचा मानबिंदू. रामायण - महाभारत कधी घडले यावर आपल्या सभ्यतेचे अस्तित्व किती जुने आहे हे ठरते.  त्यामुळे आज ही काल निश्चिती कशी करणार याविषयी औत्सुक्य आहेच. आजचं नक्की सत्र ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र १९२ : महाभारत कालनिर्णय (पूर्वार्ध) : वासुदेव कोल्हटकर

१३।१०।२०२२

सत्र १९२ वे:

विषय : महाभारत कालनिर्णय (पूर्वार्ध)

सादरकर्ते : वासुदेव कोल्हटकर 



आजचं शब्दांगण अगदीच खास ... महाभारत हा आपल्या संस्कृतीचा मानबिंदू. महाभारत हा इतिहास होता की केवळ महाकाव्य होतं असा प्रश्न पडण्याचं कारणच नाही. पण

महाभारताचा काळ म्हटलं की दोन विषय सहजच समोर येतात. 1. महाभारत या ग्रंथाचा रचनाकाळ 

2. महाभारत या कथेचा काळ. 

आजचं सत्र हे या दुसर्या मुद्द्यावर आहे. महाभारतात मांडल्या गेलेल्या खगोलीय स्थितीवरून नक्की कथा नक्की  कोणत्या काळात घडली हे मांडता येते. यावर आजचं आणि पुढचं सत्र होईल. इतर अभ्यासकांची मते तर विचारात घेतली जातीलच पण स्वतःचा विशेष अभ्यास असलेले वासुदेव कोल्हटकर यावर आपली मते सुद्धा मांडणार  आहेत. स्वाभाविकच ही सत्रे अधिक जिवंत असतील. वासुदेव कोल्हटकर आपल्या सप्रमाण मांडणीसाठी प्रसिद्ध आहेत. आजचं सत्र नक्की ऐका ! 


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र १९१ : मूलकणांचे अंतरंग (पदार्थविज्ञानाच्या विश्वाची सफर) : राधिका विंझे

०६।१०।२०२२

सत्र १९१ वे:

विषय : मूलकणांचे अंतरंग ( पदार्थविज्ञानाच्या विश्वाची सफर ) 

सादरकर्त्या : राधिका विंझे 



नमस्कार मंडळी,

जुलै २०१२ मधे जिनिव्हा येथे LHC प्रयोगात Higgs Boson (देवकण) सापडला आणि या विश्वाच्या उत्पत्तीविषयीच्या संशोधनातील एक महत्वाचा धागा गवसला. हिग्स बोसॉन मुळे विश्वाची संरचना मांडणाऱ्या मुलकणांच्या आकृतीस (Standard Model of Particle Physics) पूर्णत्व आले, परंतु आजही विश्वाविषयी काही कोड्यांची उकल झालेली नाही. आज ज्ञात असलेली ही मुलकणांची आकृती हे सैद्धांतिक व प्रायोगिक भौतिकशास्त्रातील खूप मोठे यश मानले जाते. या मूलकणांच्या आकृती पर्यंतची वाटचाल, हिग्ज बोसॉन विषयी संशोधन व अजूनही काही अनुत्तरित प्रश्नांचा आढावा म्हणजे शब्दांगणचे आजचे सत्र! ह्याच विषयात Ph.D. करत असलेली राधिका विंझे हे सत्र घेत आहे! वेगळ्या विषयावर प्रकाश टाकणारे हे सत्र नक्की ऐका !


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...