दि. १३/१२/२०१८
वक्ते- शशांक लखोटे
पुस्तक- Jonathan Livingston Seagull लेखक - Richard Bach
या पुस्तकामध्ये सीगल च्या माध्यमातून लेखकाने अशा असामान्य लोकांबद्दल लिहिले आहे जे आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर असाध्य वाटणारी स्वप्न पूर्ण करून दाखवतात. अनेक वेळा त्यांनी घेतलेला ध्यास हा समाजाला पटणारा, पचणारा नसतो, तत्कालीन समाजमान्यतांना छेद देणारा असतो परंतु आपल्या ध्येयाने भारलेली अशी माणसे कोणत्याही दबावाला, आमिषांना बळी न पडता आपले उद्दिष्ट साध्य करतात.
सीगल सारखी माणसे दूरदर्शी तर असतातच पण नम्र देखील असतात. सुरुवातीच्या काळात विरोध करणाऱ्या समाजाला ते माफ करतात आणि आपल्या तपश्चर्येतून प्राप्त झालेले ज्ञान काहीही हातचे राखून न ठेवता समाजाला परत देऊन टाकतात.
सीगल आपल्या गोष्टीतून अध्यात्मिकतेचा, आत्मिक शुद्धीकरणाचा, कैवल्यप्राप्तीचा मार्ग दाखवतो. तो वाचकांना आपले आयुष्य मुक्तपणे, परिपूर्णतेने जगण्याची प्रेरणा देतो. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्षण न् क्षण वेचत असाल तर ते स्वप्न पूर्ण करण्यापासून जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही असा विश्वास सीगलची गोष्ट आपल्याला देते.
असे हे प्रेरणादायी पुस्तक मांडले आहे शशांक लखोटे याने.
No comments:
Post a Comment