६/ १२/ २०१८
वक्त्या- नयना होलेपुस्तक - माझे सत्याचे प्रयोग
लेखक- महात्मा गांधी
माझे सत्याचे प्रयोग म्हणजे महात्मा गांधींनी मूळ गुजराथी भाषेमध्ये लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र ! हे पुस्तक एकूण पाच भागांमध्ये विभागले आहे. बहुतेक प्रकरणे ही संक्षिप्त आणि नेमकेपणाने लिहिलेली आहेत.
हे आत्मचरित्र म्हणजे गांधीजींचे अंतःकरण नेमकेपणाने दाखवणारा आरसा आहे. गांधीजींचा एक सामान्य माणूस ते भारत देशाचे राष्ट्रपिता होण्यापर्यंत झालेला प्रवास या पुस्तकातून समोर येतो.
त्यांचे बालपण, लहान वयात झालेला विवाह, शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये झालेला प्रवास, दक्षिण आफ्रिकेत वकील म्हणून काम करत असताना आलेले अनुभव, त्यांना उमगलेले सत्याग्रहाचे तंत्र आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांची भूमिका या सर्वाचा विस्तृत उहापोह स्वतः गांधीजींच्या परिप्रेक्ष्यातून वाचायला मिळतो.
गांधीजींनी लिहिलेले हे पुस्तक म्हणजे त्यांचे आत्मचरित्र जरी असले तरी त्यामागची त्यांची भूमिका ही त्यांनी अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेल्या वेगवेगळ्या सत्याच्या प्रयोगांबाबतचे त्यांचे अनुभव मांडणे आणि त्यांची वंशवाद, अहिंसा, वसाहतवाद इ.बाबतची मते स्पष्ट करणे ही आहे.
या पुस्तकाबद्दल शब्दांगणचे पहिलेच सत्र सादर केले नयना होले यांनी !

No comments:
Post a Comment