२४/१/२०१९
सत्र ७ - अक्षय कस्सा
पुस्तक - सेपियन्स
लेखक- युवल नोवा हरारी
समकालीन विचारवंतांपैकी एक युवल नोवा हरारी यांनी मानव जातीचा इतिहास मांडण्यासाठी लिहिलेले पुस्तक म्हणजे सेपियन्स ! पृथ्वीवरील एका प्रजातीचा इतिहास या दृष्टीकोनातून मानवाची प्रगती लिहिताना इतिहासाबरोबरच भूगोल, समाजविज्ञान, अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग, धर्म अशा सर्व कंगो-यांना हे पुस्तक स्पर्श करते.
वास्तविक, आधीपासून रूढ असणाऱ्या संकल्पनाच या पुस्तकात असल्या तरीही त्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन या पुस्तकातून मिळतो. लेखकाकडून नवनवे प्रश्न या पुस्तकातून मांडले जातात. काही प्रश्न अनुत्तरित राहिले तरीही हे सर्वच प्रश्न विचारप्रवृत्त करतात.
आपल्या सध्याच्या जीवनशैलीबद्दल काही शंका उपस्थित करतानाच भविष्यात मानव प्रजाती म्हणून कोणत्या बदलांना सामोरे जावे लागेल याबद्दल सुद्धा हे पुस्तक भाष्य करते.

No comments:
Post a Comment