Wednesday, December 8, 2021

सत्र ६ - विनोद देशपांडे - अटल बिहारी वाजपेयी यांची हरी हरी दुब पर ही कविता

१७/१/२०१९ 

सत्र ६ - विनोद देशपांडे 

कविता- हरी हरी दुब पर 

कवी- अटल बिहारी वाजपेयी 


                                                        


हरी हरी दूब पर
ओस की बूंदे
अभी थी,
अभी नहीं हैं|
ऐसी खुशियाँ
जो हमेशा हमारा साथ दें
कभी नहीं थी,
कहीं नहीं हैं|

क्काँयर की कोख से
फूटा बाल सूर्य,
जब पूरब की गोद में
पाँव फैलाने लगा,
तो मेरी बगीची का
पत्ता-पत्ता जगमगाने लगा,
मैं उगते सूर्य को नमस्कार करूँ
या उसके ताप से भाप बनी,
ओस की बुँदों को ढूंढूँ?

सूर्य एक सत्य है
जिसे झुठलाया नहीं जा सकता
मगर ओस भी तो एक सच्चाई है
यह बात अलग है कि ओस क्षणिक है
क्यों न मैं क्षण क्षण को जिऊँ?
कण-कण मेँ बिखरे सौन्दर्य को पिऊँ?

सूर्य तो फिर भी उगेगा,
धूप तो फिर भी खिलेगी,
लेकिन मेरी बगीची की
हरी-हरी दूब पर,
ओस की बूंद
हर मौसम में नहीं मिलेगी|

'मेरी इक्यावन कविताए' या कविता संग्रहातील ही कविता ! तसं पाहिलं तर गवताच्या पात्यांवर जमलेलं दव ही थंडीच्या दिवसात नित्य दिसणारी घटना. अटलजी राजकारणाच्या रुक्ष जीवनात राहूनही आपली संवेदनशीलता जपून ठेवतात आणि या एका घटनेतून समग्र जीवनाचे तत्त्वज्ञान मांडतात. जीवनाचे सार्थक केवळ मोठ्या घटनांमध्ये किंवा पराक्रमांमध्ये नाही तर ते छोट्या छोट्या अनुभवांमध्ये सुद्धा आहे. आयुष्य हे अशा छोट्या क्षणांनी सुखद आणि रमणीय बनते कायम टिकणारे शाश्वत सुख आपल्याला मिळू शकते का ? दुर्दैवाने याचे उत्तर नाही असेच आहे. 'एक धागा सुखाचा' या प्रसिद्ध गाण्यामध्ये हेच तर सांगितले आहे. जीवनाचे वस्त्र अनेक भावनांच्या धाग्यांनी विणले जाते. कधी हे वस्त्र सुखाचे, कधी दुःखाचे, कधी कर्तव्याचे, कधी त्राग्याचे तर कधी विसाव्याचे, एक ना अनेक ! केवळ सुखाच्या क्षणांचा स्वीकार करायचा म्हटले तर आयुष्यभर त्यामागे धावणं आलं. केवळ दुःखाचा स्वीकार केला तर सुखाचा लवलेश नाही.
 
परंतु रोजच्या जगण्यात येणारे दुःखाचे जसे क्षण असतात तसेच आनंदाचे सुद्धा असतात. पण या छोट्या छोट्या सुखाच्या क्षणांतून आपण आयुष्याचे वस्त्र विणावे. या क्षणांच्या पलीकडे एक सर्वव्यापी सत्य आहे, जे कठोर आहे, बिलकुल क्षमाशील नाही, पण त्या निष्ठुर सत्याच्या मागे लागून मी जीवनाच्या छोट्या छोट्या सुखांचा माग घेणं सोडता कामा नये. ते सत्य सर्वव्यापी आहेच पण मृदू हळवे क्षण सुद्धा अनेक आनंद निर्माण करून जातात. त्यासाठी लागणारी संवेदनशीलता आपण मनात जपली पाहिजे. आणि त्यासाठी मन अगदी टिपकागदासारखे हवे. अर्थात एवढंही संवेदनशील नको की वेलची खाल्ली, थंड झाली आणि लवंग खाल्ली उष्ण झाली. आपल्या जीवनात निसर्गाला वाव हवा. त्याच्याबरोबर आपलं नातं आतून हृदयाने जोडलेलं असलं कि असे क्षण आपल्याही जीवनात येतात. उद्या येणाऱ्या संकटांची चिंता करत जगू नये, आजच्या क्षणांमध्ये आनंद शोधावा हाच बोध अटलजी आपल्या कवितेतून देतात.

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...