सत्र १८ - रिद्धी करकरे
विषय - मॅड करणारा लंपन
( प्रकाश नारायण संत यांच्या कादंबऱ्यांमधील मनोवेधक पात्र )
पौगडावस्था हा शब्द आपण सध्याच्या काळात बऱ्याच वेळा ऐकतो , वाचतो पण साठच्या दशकापासून पुढील तीस चाळीस वर्षे अत्यंत साध्या, ओघवत्या भाषेत शाळकरी वयातल्या मुलाच्या भाव विश्वाचे अतिशय तरलतेने चित्रण केलं ते प्रकाश नारायण संत यांनी! अत्यंत निरागस, संवेदनशील आणि लाघवी असा शाळकरी वयातला ' लंपन ' म्हणजे प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र ' वनवास ' , ' शारदा संगीत' , ' पंखा ' आणि ' झुंबर ' अशा चार कथासंग्रहातून आपल्याला भेटतो ! बेळगाव कडच्या मराठीत आणि खास लंप्याच्या निराळ्याच शैलीत वाचकांनाही वय विसरायला लावणाऱ्या या कथा लंपन च्या उमलत्या भावविश्वाचे सुंदर दर्शन घडवतात.
पु. ल. देशपांडे या कथांबद्दल लिहितात,
"लंप्याच्या भाषेत सांगायचं तर एकदा नाही दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी या कथा मॅड सारख्या वाचल्या तरी त्या ताज्याच वाटतील"



No comments:
Post a Comment