Wednesday, December 8, 2021

सत्र १९ - शशांक कुंभारे - फेसाटी - नवनाथ गोरे

२५/४/२०१९ 

सत्र १९- शशांक कुंभारे 

पुस्तक - फेसाटी

लेखक - नवनाथ गोरे 

साहित्य अकादमी युवा साहित्य पुरस्कार २०१८ प्राप्त कादंबरी आई सांगायची, चार बुकं शिकलास तर एखादी नोकरी लागेल. चांगलं-चुंगली कापडं अंगावर येतील, चार घास खायची सोय होईल. खस्ता खात शिक्षणाकडे वळलो, पुढे शिक्षणातून जिवंत झालेल्या जाणिवांतून  लेखक लिहू लागले. आपणही आपले जग शब्दात मांडावे असे वाटू लागले. जीवनात प्रत्येक व्यक्ती आपलं जगण आपल्या परीने शोधात असतो. तसेच लेखक हे एक माणूस म्हणून त्याचं जगण- भोगण आणि एकूणच अनुभवण शोधात होते. त्यातून जे गवसलं ते येईल तसं मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि 'फेसाटी' ची निर्मिती झाली. सुखाचा प्रकाश कमी आणि त्यामानाने दुःखाचा डोंगर मोठा ! दुष्काळाशी लढत असलेले लोक, अनेक प्रसंगांना सामोरे जाणारे लोक आणि अत्यंत भीषण परिस्थितीत सुद्धा हिम्मत न हारणारी अशी वेगवेगळी माणसे या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळतात. शिक्षणासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी, कुटुंबियांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी लेखकाने केलेला संघर्ष अत्यंत प्रेरणादायी आहे. 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...