Wednesday, December 8, 2021

सत्र २४ - गणेश ठोंबरे - संस्कार - यू. आर. अनंतमूर्ती

६/६/२०१९ 

सत्र २४ - गणेश ठोंबरे 

पुस्तक - संस्कार 

लेखक - यू. आर. अनंतमूर्ती 


संस्कार ही ज्ञानपीठ मानकरी, ख्यातनाम कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांची कादंबरी. सत्राचे वक्ते गणेश ठोंबरे यांनी ती अत्यंत कथात्मक रीतीने मांडली. 

संस्कार या अनंतमूर्ती यांच्या पहिल्याच कादंबरीने समाजमनात खळबळ माजली. या कादंबरीत हिंदू धार्मिक ग्रंथ, परंपरा, रूढी यावर कथानकाच्या ओघात उपहासाचे, टीकेचे आसूड ओढले आहेत. त्यामुळे सनातन्यांनी याला विरोधही केला. ही कादंबरी ब्राह्मण, परंपरा, हिंदू धार्मिक ग्रंथ यावरील कठोर टीका असल्याने विद्रोही साहित्यातही तिची गणना होते. 

कादंबरीच्या सुरुवातीलाच जन्माने ब्राह्मण परंतु रूढार्थाने पापमय जीवन जगलेला नारायण याचा मृत्यू घडतो. लग्नाच्या बायकोला सोडून चंद्री या वेश्येशी संसार करणाऱ्या, मांसाहार आणि दारू यांच्या आहारी गेलेल्या या माणसाचा अंत्यसंस्कार करावा की करू नये या वादंगावर ही कादंबरी सुरु होते. प्रेत तसेच पडलेले आहे आणि पवित्र आयुष्य आणि धर्मनिंदक जीवन, भौतिक सुख आणि आध्यात्मिक सुख यांतील संघर्ष मांडत अनेक खळबळजनक घटना दाखवत ही कादंबरी पुढे जाते. 

आपल्या मनातील नीती- अनीतीची, धार्मिक- अधार्मिकतेची, अशी अनेक आंदोलने ही कादंबरी अत्यंत तरलतेने चित्रित करते आणि हेच या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...