Wednesday, December 8, 2021

सत्र १४ आणि १५- विनोद देशपांडे - एका दिशेचा शोध

१४/३/२०१९, २८/३/२०१९ 

सत्र १४,१५ - विनोद देशपांडे 

पुस्तक - एका दिशेचा शोध 

लेखक - संदीप वासलेकर 

वसुधैव कुटुंबकम् यावर भाष्य करणारे हे पुस्तक आहे. विकसित देश विकसनशील देशांना मदत करून विकास घडवू शकतात हे सांगितले आहे. मूळ धारणा बदलली पाहिजे. आपण विकसित होत असताना आपण काय भान राखले पाहिजे यावर भाष्य करणारे हे पुस्तक आहे. ज्या समाजात नेते मोठे तो देश लहान तसेच ज्या समाजाचे नेते लहान तो देश मोठा असे समजले जाते. कोणत्या देशात कशा प्रकारची माणसे व कशा प्रकारची वागणूक तसेच वेगवेगळ्या देशातील वेगवेगळी शिस्त, नियम आणि धारणा असतात. आपली कर्तव्ये आपण प्रामाणिकपणे पार पाडली तर देश आपोआपच पुढे जातो. आपण समाज म्हणून इतरांवर अवलंबून राहतो. आपण कसे जगतो व कसे जगायला पाहिजे याची चर्चा पुस्तकात केली आहे. 

श्रमाला किती महत्त्व देतो आणि द्यायला पाहिजे याबद्दल एक विचार मांडलेला दिसतो. विकसित देशात knowledge आणि technology अर्थात ज्ञान आणि तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व दिले आहे तसेच संशोधनाला सुद्धा ते महत्त्व देतात. आपल्या देशात मात्र कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचे याचे निकष परंपरागत ठरलेले दिसतात. 

आपण आपल्या येणाऱ्या पिढीबद्दल संवेदनशील आहोत का ? आपण आपली कर्तव्ये आणि नियम याबद्दल संवेदनशील आहोत का ? उत्तर हो असेल तर आपण महासत्ता होण्याच्या मार्गावर आहोत. जो अधिकार ज्याचा त्याला मिळाला पाहिजे असे मानणारा समाज निर्माण व्हायला पाहिजे तसेच दहशतवाद आणि युद्ध या गोष्टींवर सुद्धा चर्चा झालेली दिसते. 

माणसाचे आयुष्य हे एका designed map प्रमाणे आहे ते निसर्गावर फारसे राहिलेले नाही. माणूस, विषमता आणि पृथ्वी यांचा एकत्रित विचार व्हायला हवा. नव्या विचारांची गरज प्रस्थापित व्हायला हवी. त्याच जोडीला राजकीय , सामाजिक, आर्थिक इ. दृष्टीने विचार व्हायला हवा. आपण आत्ता काय आहोत याचा विचार न करता सतत चालत राहायला हवं. ज्ञानाचा प्रवाह इतका मोठा आहे की त्यापुढे जग झुकते. महासत्ता होण्यापेक्षा महान राष्ट्र होण्याचा प्रयत्न करा असे वासलेकर म्हणतात. 


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...