७/३/२०१९
सत्र १३- अमिता गायकवाड
पुस्तक- निसर्गायण
लेखक - दिलीप कुलकर्णी
निसर्गायण हे पुस्तक मानवी जीवनाच्या पृथ्वीवरच्या जीवनाच्या शाश्वततेसंदर्भात भाष्य करते. पर्यावरणवाद हा सामान्यतः मानवाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या दृष्टीकोनातून त्याच्या जीवनमानाचा स्तर कायम ठेवत पर्यावरणाचा विचार करतो. प्रत्यक्षात मात्र स्थिती अधिक भयावह आहे. निसर्गायण हे पुस्तक शास्त्रोक्त पद्धतीने पर्यावरण आणि मानव यांचा अन्योन्य संबंध ओळखत मानवी जीवन पृथ्वीच्या ऱ्हासाला कारणीभूत न ठरण्याचा प्रयत्न करत जीवनशैली कशी असावी यावर भाष्य करतं. प्रत्यक्ष दिलीप कुलकर्णींची याविषयावरची कार्यशाळा अनुभवणं हा एक अत्यंत जिवंत अनुभव आहे. आणि हा अनुभव १६ मार्च ला प्रत्यक्ष 'प्राचीन भारतातली शाश्वतता' या विषयावर घेता आला. तत्पूर्वी त्याचा ट्रेलर निसर्गायण या त्यांच्या पुस्तक परिचयाच्या माध्यमातून आयोजित केला गेला.
No comments:
Post a Comment