Wednesday, December 8, 2021

सत्र २२ - पालवी मोघे - आवरण - डॉ. एस. एल. भैरप्पा

२३/५/२०१९ 

सत्र २२ - पालवी मोघे 

पुस्तक - आवरण 

लेखक - डॉ. एस. एल. भैरप्पा 


कथेची नायिका - पुरोगामी विचारांची 'लक्ष्मी' आपल्या विचारांना पटेल तेच करत जाते. अगदी लग्न आणि धर्मांतर सुद्धा! त्यातून आयुष्याला मिळालेल्या कलाटणी मधून तिचा धर्म, नातेसंबंध, समाज यासोबत स्वतःला शोधत जाण्याचा ,अंतिम सत्य काय, आपला खरा इतिहास काय याचा शोध  घेत अज्ञानाची आवरणं दूर सारत नेणारा प्रवास म्हणजे ही रंजक कादंबरी आवरण.

आम्ही लावियेला कैवल्याचा दीप 

अंधाराचे रूप पालटले  

अशा अर्थाचं एक गाणं आहे... अर्थात ज्ञानाचा दिवा लावला आणि अंधार नाहीसाच झाला... आवरण वाचलं तर याचा प्रत्यय येतो. 

धर्माचा आपल्या मनावर असलेला पगडा / उदारमतवाद / आणि व्यक्ती म्हणून असलेली आपली विचारधारा यांच्यातला संघर्ष पुस्तक अधोरेखित करतंच पण कथेत मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या नायिका (हिंदू ) आणि नायकाच्या (?) (मुस्लिम) असलेल्या  बेगडी संसाराच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक तथ्यांसह धार्मिक संघर्ष अत्यंत प्रत्ययकारी स्वरूपात मांडतं. एस. एल. भैरप्पांचे पुरोगामी सुद्धा टीकाकार आहेत आणि हिंदुत्ववादी सुद्धा... एखाद्या लेखकाच्या भूमिकेबद्दल आणखी वेगळी ती पावती काय  पाहिजे? हे पुस्तक जरूर वाचावं असंच ! 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...