Wednesday, December 8, 2021

सत्र २१ - श्री. अजिंक्य नवरे - कठोपनिषद

१६/५/२०१९ 

सत्र २१ - श्री. अजिंक्य नवरे 

विषय - कठोपनिषद 


हिंदू तत्त्वज्ञानात एकूण १०८ उपनिषदे आहेत व त्यातील  १० उपनिषदे प्रमुख मानली जातात. यामध्ये कठोपनिषद हे अत्यंत लोकप्रिय उपनिषद आहे. "कस्मै मां दास्यसि" (तुम्ही मला कोणाला दान देणार?) असे वारंवार विचारले असता "मृत्यवे त्वा ददामि" (तुला मृत्यूलाच दान देतो) अशी पित्याची आज्ञा झाल्यावर आनंदाने यमसदनी जाणारा नचिकेत आणि त्यावर प्रसन्न होऊन तीन वर देणारे यमराज यांच्यातील रोचक संवाद म्हणजे कठोपनिषद! "उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत " या स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेल्या गुरुमंत्राचे उगमस्थान म्हणजे कठोपनिषद! आपण सगळेच जण मृत्युला टाळत असतो. मृत्युपासून दूर पळत असतो. त्याला घाबरत असतो. जीवनाचा स्वीकार करताना मृत्युच्या आठवणींपासून सुद्धा दूर पळत असतो. पण नचिकेत वडीलांच्या सांगण्यावरुन प्रत्यक्ष यमाच्या दारी पोचतो.... प्रत्यक्ष मृत्युकडून सुद्धा शिकण्यासारखे बरेच काही आहे....मात्र भौतिक गोष्टींमध्ये न अडकलेला, शुद्ध विचार असलेला आत्मा हवा. मनात शुद्ध ज्ञानाची तळमळ हवी....

जीवनातला सर्वात महान शिक्षक मृत्यु किंवा यम आणि नचिकेत यांच्या संवादातून उलगडणारं तत्वज्ञान सोपं करून सांगितलं श्री. अजिंक्य नवरे यांनी ! 

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...