२०/६/२०१९
सत्र २६ - श्री अजिंक्य नवरे
पुस्तक- The Hindu View Of Life
लेखक- सर्वपल्ली राधाकृष्णन्
आपण अनेकदा हिंदुत्वाचा विचार हा प्रतिक्रियात्मक करतो. विशेषतः इस्लामी आणि ख्रिश्चन धर्माच्या अनुषंगाने किंवा त्यांच्या धर्मप्रसाराच्या पार्श्वभूमीवर! भेदांवर चर्चा करताना विशेषतः इस्लाम धर्माच्या राजकीय भूमिकांची तुलना आपण हिंदू, धार्मिक, अध्यात्मिक परंपरेशी करतो. सामान्यतः आपले हिंदुत्वाचे ज्ञान हे 'त्यांचे' तसे तर आमचे 'असे' अशा चर्चा झडण्याएवढे मर्यादित राहते. त्यामुळेच आपल्या चर्चांमध्ये सामाजिक व राजकीय हिंदुत्व आणि अध्यात्मिक हिंदुत्व असे खरंतर दोन अत्यंत वेगळे भाग पडतात. आपल्या राजकीय भूमिकेनुसार आणि सामाजिक आकलनानुसार हिंदुत्वाबद्दल आपली मत मतांतर असतीलही पण सर्वपल्ली राधाकृष्णन, विनोबा भावे यांसारख्या दृष्ट्यांनी मांडलेली आध्यात्मिक हिंदुत्वाची भूमिका समजली की हा भेद कसा हाताळायचा हे सुद्धा नक्की कळते. म्हणूनच या शब्दांगणमध्ये 'हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ' म्हणजेच जीवनाकडे पाहण्याचा हिंदू दृष्टीकोन या सर्वपल्ली राधाकृष्णन लिखित पुस्तकाचा परिचय करून दिलेला आहे, अजिंक्य नवरे! हिंदू तत्वज्ञानाचा अभ्यासक म्हणून अजिंक्यचा आपला परिचय आहेच. तरुण तत्वचिंतकांकडून अशा पुस्तकांचा परिचय करून घेण्यातही आगळाच आनंद आहे. साध्या सोप्या उदाहरणांमधून क्लिष्ट विषय समजावून सांगण्याची त्याची हातोटी लक्षवेधक आहे.
No comments:
Post a Comment