Wednesday, December 8, 2021

सत्र १२ - सौ. मंगला चौधरी - मराठी साहित्यातील तेजस्वी तारा : कवी कुसुमाग्रज ( मराठी राजभाषा दिन विशेष )

२८/२/२०१९ 

सत्र १२- सौ. मंगला चौधरी 

विषय - मराठी साहित्यातील तेजस्वी तारा : कवी कुसुमाग्रज 

माझ्या मराठी मातीचा 

लावा ललाटास टिळा | 

हिच्यासंगे जागतील 

दऱ्याखोऱ्यातील शिळा || 

कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुण्यात झाला. मराठी भाषेची सेवा करणाऱ्या या साहित्यिकाचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. 

कुसुमाग्रज केवळ कवी नव्हते, तर कथाकार, कादंबरीकार, नाटककार, स्तंभलेखक, वृत्तपत्रलेखक सुद्धा होते. ही सारी साहित्य निर्मिती करतानाच त्यांनी सामाजिक तत्वचिंतक व विचारवंत आणि संवेदनशील कार्यकर्ता असा आपला पिंडही जपला. असे ते एक विविधांगी व्यक्तिमत्त्व होते. लोक त्यांना आदराने 'तात्यासाहेब' म्हणत असत. 

पुरस्कार - 

१) मडगाव येथील १९६४ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद 

२) १९८८ - ज्ञानपीठ हा भारतीय साहित्याचा सर्वोच्च पुरस्कार 

३) १९८९- मुंबईतील पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्षपद 

४) १९९१- भारत सरकार तर्फे पद्मभूषण पुरस्काराने गौरव 

५) १९९६- अवकाशातील एका ताऱ्याला कुसुमाग्रज तारा हे नाव 

वि. वा. शिरवाडकर यांची नाटकं ही नाट्यशारदेच्या कंठातील रत्नहारासारखी लखलखतात. रंगभूमीवर जे रौद्र, भीषण वा करुण, जीवनस्पर्शी नाट्य ते उभारतात ते पाहून प्रेक्षक थक्क होतो. नाटकामध्ये मानवी मनाचा शोध हे त्यांना गवसलेले सूत्र आहे. नटसम्राट नाटकाने तर या सर्व मनोऱ्यावर कळस चढवला आहे. 

अशा या थोर साहित्यिकाच्या जीवनाचा, साहित्यकृतींचा थोडक्यात आढावा घेणारे हे सत्र ! 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...