सत्र ५ - चिन्मय पुराणिक
पुस्तक- राष्ट्रवाद: ३६० अंशातून (दिवाळी अंक )
मानवी जीवनात राष्ट्र ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. सध्या जगात या संकल्पनेला धरून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असे वादविवाद होताना दिसतात. भारत सुद्धा त्याला अपवाद नाही. एकाच राष्ट्रात राहून भारताला आपली मातृभूमी मानून जात, धर्म यावर कर्मभूमी ठरवणारे गट आज देशात आढळतात.
भारताचा इतिहास साधारणपणे १० हजार वर्षे जुना. Civilised समजल्या गेलेल्या अनेक संस्कृती या काळात उदयाला येऊन लोप पावल्या, मात्र भारत टिकून आहे. अत्युच्च पातळीचे मानवाधारित तत्त्वज्ञान हे तिचे गमक! मात्र आपले राष्ट्र आणि परकीय Nation या दोन संकल्पना कशा वेगळ्या आहेत, हे राष्ट्रवाद: ३६० अंशातून या दिवाळी अंकातून आपल्या समोर येते.
प्राचीन भारतातून सुरु झालेला टोळ्यांच्या राष्ट्राचा प्रवास आज राष्ट्रांच्या टोळ्यांवर, ज्याचं आंतरराष्ट्रीय राजकारणात Alliance असं वर्गीकरण होतं आणि त्यात भारताचे असलेले स्थान हा कालखंड हे पुस्तक आपल्या समोर आणते. असं म्हणतात, "प्रत्येक विचारवंत हा त्याच्या काळाच्या सुसंगत असतो. राष्ट्र सुद्धा तसेच असते. आणि त्यामुळे राष्ट्रवादी विचार करणारे विचारवंतही काळाचे भान आणि भविष्याची जाण ठेऊन आपली मांडणी करतात.
कृष्ण, चाणक्य, बंकिमचंद्र, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद, सरदार पटेल, नेहरू, गांधी, आंबेडकर, बाळासाहेब, रा.स्व.संघ, सावरकर, दीनदयाळ, काही राजकीय पक्ष आणि इस्लाम धर्म या सर्वांची राष्ट्रवादाची व्याख्या, काहींची प्रखर-तेजस्वी तर काहींची मवाळ-ओजस्वी, काहींची वैचारिक तर काहींची कृतीशील, काहींची class ची तर काहींची mass ची, वाचकाला खरंच ३६० अंशातून फिरवून स्वतःवर आणून अंतर्मुख करते.
राष्ट्रवाद ही भावना आहे, अनुभवायची !

No comments:
Post a Comment