२६ ।०५।२०२४ - राष्ट्रीय सौर ०५ ज्येष्ठ १९४६
सत्र २५७वे:
विषय : सावरकर विचारधारा
सादरकर्ते : श्री. दुर्गेश परुळकर
समुद्राची खोली आणि पर्वताची उंची फुटपट्टीत मोजली जात नाही त्यासाठीचे निकष वेगळे असावे लागतात. ते फॅदम आणि मीटर्स / किलोमीटर मध्ये मोजले जातात. आपण बऱ्याचदा महापुरुषांचे माहात्म्य मोजताना त्यांना आपल्या फुटपट्टीमध्ये मोजण्याची चूक करतो. बरे आपल्या सोयीनुसार त्यांच्याबाबत तथ्येही आपण निवडत जातो. गांधींचे मूल्यमापन करताना प्रामुख्याने विचारधारा आणि सावरकरांबद्दल विचार करताना प्रामुख्याने ऐतिहासिक घटना अशा तुलनेकरता घेतल्या जातात. त्यांची तुलना करताना स्वाभाविक वस्तुनिष्ठता दिसत नाही. हे लिहिण्याचं कारण म्हणजे शब्दांगणचं आजचं सत्र. सावरकरांची विचारधारा हा विषय गेले अनेक महिने मनात होता. पण तो मांडण्यासाठी त्याच तोलामोलाची व्यक्तीही हवी होती. सध्या विशेषतः राजकीय वर्तुळात सावरकरांचे नाव चर्चेत. पण ज्यांना शिवाजी महाराज कळले नाहीत त्यांना सावरकर कळणं सुद्धा कठीण. गांधी गोंधळ हा जोडीला पुढे आहेच. या पार्श्वभूमीवर इतिहासतज्ज्ञ दुर्गेश परुळकर सावरकर विचारधारा मांडत आहेत. दुर्गेश परुळकर यांच्यासारखा वक्ता आज आपल्याला लाभलाय, हे आपले भाग्यच. नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment