०९।०३।२०२३
सत्र २१३वे:
विषय : आत्मभान
सादरकर्त्या : प्राजक्ता देवधर
मंडळी आजचं सत्र अगदी खास! कालच आपण सर्वांनी जागतिक महिला दिन साजरा केला. महिलांच्या सक्षमीकरणाची, स्वावलंबनाची चर्चा करताना आर्थिक मुद्दा अतिशय महत्वाचा. परंतु त्याचा विचार तिने कमावणे या पलीकडे बऱ्याचदा जात नाही. खर्च, आर्थिक नियोजन , गुंतवणूक आणि त्यातून तिचं निर्णय प्रक्रियेत बळकट होत जाणारं स्थान ही सक्षमीकरणाची महत्वाची वाट! आजचं शब्दांगणचं सत्र ' आत्मभान ' हे या विषयाची मांडणी करणारं आहे. सादर करणार आहेत पेंढारकर कॉलेज मधील निवृत्त प्राध्यापिका डॉ. प्राजक्ता देवधर मॅडम. ३५ वर्षे विद्याथ्यांना जवळून बघणाऱ्या मॅडमनी त्यासोबत विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांसाठी कार्यही केले आहे, करत आहेत. त्यांच्या अनुभवातून दृष्टीस पडलेल्या महिलांच्या सक्षमीकरणाचा या वाटेचा धांडोळा ऐकण्यासाठी नक्की या !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment