Monday, March 13, 2023

सत्र २०८ : भारतीय अर्थव्यवस्था : डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि भविष्यकाळ : श्रीराम कुंटे

०२।०२।२०२३

सत्र २०८वे:

विषय : भारतीय अर्थव्यवस्था : डिमॉनिटायझेशन, जीएसटी आणि भविष्यकाळ

सादरकर्ते : श्रीराम कुंटे



कालच आपलं बजेट संसदेत मांडलं गेलं, त्याचे अर्थ आणि अनर्थ आपण चर्चांमध्ये ऐकत असालच. आजचं सत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेविषयी. बहुचर्चित डिमॉनेटायझेशन पासून आत्ता परवाच्या आपल्याला मिळालेल्या G -२० च्या अध्यक्षपदाबाबत. अर्थव्यवस्थेतल्या आपल्या सामर्थ्यांचा आणि कच्च्या दुव्यांचा घेतला जाणारा मागोवा. अर्थशास्त्र आणि राजकारण सोबत जातं. Good economics is not good politics असं म्हटलं जातं. आपली प्रामुख्याने अर्थशास्त्राची चर्चा ही सुद्धा राजकारणाच्या अंगानेच झडत जाते. त्यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेच्या स्थितीचा हा आज वेध घेतला जाईल.
श्रीराम कुंटे शब्दांगण मधल्या त्यांच्या मागच्या दोन अभ्यासपूर्ण सत्रांमध्ये आपल्याला परिचयाचे असतीलच.. नर्म विनोदी तरीही काही वेळा अंतर्मुख करणारं त्यांचं वक्तृत्व, आणि काहीवेळा आरसा दाखवणाऱ्या तथ्यांची मांडणी आणि त्यातून विवेकाला केलेले आवाहन, *श्रीराम कुंटे* उत्तम संवादक आहेत. त्यांच्या सत्राचा अनुभव घेण्यासाठी नक्की या.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...