२६।०१।२०२३
सत्र २०७वे:
विषय : राष्ट्रनिर्माते विवेकानंद
सादरकर्ते : प्रा. नरेंद्र जोशी
मंडळी, आजचं शब्दांगण अतिशय खास! आजचे शीर्षक पाहीले तर काहींच्या भुवया उंचावतील. विवेकानंद कितीही आदरणीय असले तरी राष्ट्रनिर्माते म्हणून त्यांचा उल्लेख करावा का ? हा प्रश्न काहींना पडला असेल. ५००० वर्षांच्या तरुण भारताचे निर्माते विवेकानंद कसे? त्या पंडिती अर्थाने हा शब्द प्रयोग नाही. आधुनिक भारताची संकल्पना विवेकानंदांच्या कार्यातून स्पष्ट होते. भारत स्वतःला विवेकानंदांच्या माध्यमातून शोधत गेला.
आधुनिक भारताचं भारतीयत्व आपल्याला सापडत गेलें. आधुनिक काळात भारताला 'नेशन इन मेकिंग' अशी संज्ञा दिली गेली. सांस्कृतिक दृष्ट्या भारत हजारो वर्षे अस्तित्वात असला तरी राजकीय दृष्ट्या आजचा भारत १९४७ साली अस्तित्वात आला. राष्ट्र आणि नेशन यात फरक आहे अशी मांडणी अनेकांनी केली. पण विवेकानंदांच्या विचारांमध्ये भारताचा इतिहास, भूगोल, धर्म आणि संस्कृती हे अविभाज्य घटक आहेत. या भूमीतच हा धर्म, आणि ही संस्कृती उदयाला येऊ शकली. आणि ती जर टिकायला हवी असेल तर आमचा भूगोल - म्हणजेच आमची भूमीसुद्धा टिकायला हवी आणि इतिहासाचं योग्य आकलन सुद्धा असायला हवं. त्याचं परिशीलन सुद्धा व्हायला हवं.
अपने अतीत को पढकर
अपना इतिहास उलटकर
अपना भवितव्य समझकर
हम करे राष्ट्र का चिंतन !
हाच आजच्या सत्राचा उद्देश.
आजचा वक्ता हा ज्ञानवंत आणि कर्मसिद्ध दोन्ही आहे. प्रा. डॉ. *नरेंद्र जोशीं* मध्ये, विवेकानंद केंद्राच्या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्ञानातली आणि आचरणातली शीतलता - त्यांच्या मृदू व्यक्तिमत्वात भरून राहीली आहे. आजच्या विषयाचा आणि वक्त्याचा असा अनुभव घेण्यासाठी नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment