२३।०२।२०२३
सत्र २११वे:
विषय : छत्रपतींचे आरमार आणि आधुनिक भारतीय नौसेना
सादरकर्त्या : संजीवनी खापरे आणि आदिती पारेकर
आजचं शब्दांगण मूळ उद्देशाला साजेसं. ध्रुव च्या दोन विद्यार्थिनी *आदिती पारेकर* आणि *संजीवनी खापरे* घेतायत. विषय अर्थातच लक्ष्यवेधक - *छत्रपतींचे आरमार आणि आधुनिक भारतीय नौसेना* . भविष्य घडवण्यासाठी इतिहासाचे स्मरण आवश्यक. भारतीय आरमाराचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. आज भारतीय नौसेनेचे सामर्थ्य जगात ओळखले जाते. हिंदी महासागरात एका अर्थाने आपली दादागिरी चालते. आजच्या सत्राच्या निमित्ताने यांचा धांडोळा घेऊयात.
आदिती आणि संजीवनी ध्रुव मध्ये आपल्या अभ्यासाकरिता आणि विविध उपक्रमांमधल्या सहभागाकरता ओळखल्या जातात. आज प्रथमच शब्दांगण मध्ये सत्र घेतायत. त्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment