२४।०३।२०२२
सत्र १६५ वे:
पुस्तक: The Godfather
लेखक: Mario Puzo
सादरकर्ते : डॉ. प्रल्हाद देशपांडे
आजचे शब्दांगण अगदी खास! गॉडफादर या बहुचर्चित पुस्तक आणि सिनेमावर आजचं सत्र होतंय. गॉडफादर हा इटालियन माफिया वर बनलेला सिनेमा. पण एका भूगोलापूरता मर्यादित न राहता या चित्रपटाने जगावर प्रभाव टाकला.केवळ रसिकांना नव्हे तर अगदी माफियांनाही हा चित्रपट हवासा वाटला, हे आपल्या जीवनाचे चित्रण आहे असे त्यांना वाटले आणि काहींना तर अल पचिनोने रंगवलेल्या विटो या पात्राची नक्कल करावी असं सुद्धा वाटलं. एकूणच गॉड फादर विषयी ऐकण्याची उत्सुकता निर्माण होणं स्वाभाविकच !
आजचं सत्र डॉ. प्रल्हाद देशपांडे घेतायंत. स्वभावाने नेमस्त, वागणुकीने प्रेमळ, आणि चेहऱ्यावर सदैव मंद स्मित बाळगणाऱ्या, कविमनाच्या डॉक्टरांनी या विषयावर आजचे सत्र घेणे हे सुद्धा विलक्षण.
हे सत्र नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !!

No comments:
Post a Comment