Thursday, April 28, 2022

सत्र १७० : माझी कॉर्पोरेट दिंडी : माधव जोशी (मुलाखतकार - श्रीराम शिधये)

 २८।०४।२०२२

सत्र १७० वे:

विषय : माझी कॉर्पोरेट दिंडी

सादरकर्ते : माधव जोशी

मुलाखतकार : श्रीराम शिधये



भारतीय उद्योग विश्वातील स्थित्यंतरे जवळून पाहिलेल्या, नव्हे नव्हे, तर त्यात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माधव जोशी यांचे हे अनुभव म्हणजे अभ्यासकांसाठी एक महत्वाचा ठेवा बनेल. पुस्तकाच्या प्रकाशनाच्या पूर्व एक curtain raiser म्हणावा असा त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आपण करत आहोत. त्यांची मुलाखत घेणार आहेत विचारवंत ज्येष्ठ पत्रकार आणि 'एका जनार्दनी अर्थात आरोग्य मनाचे ' चे लेखक श्री. श्रीराम शिधये .विशेषतः १९९१ नंतरच्या म्हणजेच आर्थिक सुधारणा नंतरच्या  काळात औद्योगिक क्षेत्रात झालेले बदल, विशेषतः टाटा आणि इतर अनेक उद्योजक यांची कार्यप्रणाली जवळून पाहिलेले माधवराव  जोशी यांच्या अनुभवांचे कथन कॉर्पोरेट दिंडी या पुस्तक रूपाने १ मे ला प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वी आजच्या शब्दांगण मध्ये त्यांच्या मुलाखतीचा योग आला आहे. हे सत्र चुकवू नका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...