०७।०४।२०२२
सत्र १६७ वे:
पुस्तक: धागे
लेखक: गुलजार (शब्दांकन - अनंत दीक्षित)
सादरकर्ते : विनोद देशपांडे
उर्दू शायरी आणि गझल हा प्रत्येक काव्यरसिकाचा जिव्हाळ्याचा विषय ! मिर्झा गालिबपासून बशीर बद्र यांसारख्या उर्दू कवींच्या गझलांनी जनमानसावर गारुड केलेलं आहे. यातलंच एक प्रमुख नाव म्हणजे गुलजार ! जवळपास तीन पिढ्यांवर गुलजारांच्या लेखणीचा प्रभाव आहे. असा या गुलजारांचा एक व्यक्ती म्हणून परिचय, त्यांचं भावविश्व, त्यांच्या संवेदना यांचा अत्यंत जवळून परिचय आपल्याला धागे या त्यांच्या संकलित लेखांच्या पुस्तकातून होतो. याच पुस्तकाचा आजच्या शब्दांगणच्या सत्रामध्ये परिचय करुन देत आहेत विनोद देशपांडे. एका अनोख्या भावविश्वाची सफर करुन येण्यासाठी नक्की ऐका हे सत्र !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment