Thursday, April 28, 2022

सत्र १६९ : नर्मदा परिक्रमा : आकाश गुप्ते

२१।०४।२०२२

सत्र १६९ वे:

विषय : नर्मदा परिक्रमा

सादरकर्ते : आकाश गुप्ते



ललितसितदुकूलां मंज्जुमूलां महेशीम् 

करकलिकुटाक्षा अभित्यभीष्टां सुकेशीम् ।

मणिखचितविभूषां भाल बालेंदुभूषाम् 

शिरसि धृत किरीटां नर्मदां चिन्तयामि ॥

आपल्या परंपरेमध्ये नद्यांना विशेष महत्त्व आहे, किंबहुना सिंधू, सरस्वती, गंगा, यमुना अशा नद्यांच्या काठावरच आपली संस्कृती विकसित झालेली आहे. त्याच नद्यांच्या मांदियाळीतली महत्त्वपूर्ण नदी म्हणजे नर्मदा !

संपूर्ण भारताला बरोबर मध्यावर विभागणारी किंवा खरंतर उत्तर आणि दक्षिण भारताला जोडण्याचं काम करणारी ही नदी ! कदाचित त्यामुळेच इतर नद्यांना‌ सहसा न‌ मिळणारा परिक्रमेचा मान या नदीला मिळाला असावा. आणि या परिक्रमेला अजून उत्कंठावर्धक करतात ते अश्वत्थाम्याच्या दर्शनासारखे रोमांचकारी अनुभव आणि त्या प्रवासात भेटणार्‍या माणसांच्या विविध प्रवृत्ती.. त्यामुळे अनेकांना हा अनुभव आयुष्यात एकदा तरी घ्यावा असं वाटत असतंच..

याच नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर यंदाचं सत्र घेतायत आकाश गुप्ते !

आणि मुख्य म्हणजे कोविडनंतर प्रथमच ऑफलाईन स्वरुपात सत्र संपन्न होणार आहे त्यामुळे हा विलक्षण अनुभव नक्की चुकवू नका.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...