१४।०४।२०२२
सत्र १६८ वे:
पुस्तक: ताई (पद्मभूषण सुमित्रा महाजन यांच्या लोकसभा अध्यक्षीय कारकिर्दीचा आढावा)
लेखिका व सादरकर्त्या : डॉ. मेधा किरीट
मंडळी, आजचे शब्दांगण अतिशय खास ! मेधा किरीट आजचे सत्र घेणार आहेत. तेही लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन यांच्यावर त्यांनी लिहिलेल्या 'ताई' या पुस्तकावर. भारताला सुसंस्कृत, सुजाण आणि संयमित नेत्यांची एक समृद्ध परंपरा लाभली आहे. सुमित्राताई हे त्यातील एक आघाडीचे नाव. पूर्व लोकसभेच्या अध्यक्षा, सुमित्राताईंच्या लोकसभा अध्यक्षपदाच्या कारकीर्दीचा बहुपदरी आलेख या पुस्तकात मांडला आहे. एकाच वेळी लखलखती बुद्धी आणि सहृदयता , मार्दव ह्यांचा मिलाफ राजकारणी व्यक्ती मध्ये बघायला मिळणे तसे कठीणच. या गुण वैशिष्ट्यांचे दर्शन आजच्या सत्रात होईल. आजच्या वक्त्या डॉ. मेधा किरीट यांचे कार्य आणि लेखन यांचा स्वतःचा एक प्रभाव आहेच, पण त्यांचे अभिवाचन आणि वक्तृत्व सुद्धा अनुभवण्यासारखे. ज्ञान आणि कर्तृत्व यांचा संगम आजच्या वक्त्या आणि विषय दोन्हीमध्ये मिळतो. हा अनुभव चुकवू नका..
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment