०५।०५।२०२२
सत्र १७१ वे:
विषय : मुद्राराक्षस
सादरकर्ते : डॉ. नम्रता जगताप
-अहो कोण तुम्ही?? आमच्या आचार्य चाणक्यांना ज्ञान देतो म्हणणारे.. आचार्य सर्वज्ञ आहेत😡
- असे काही नाही बरं का... सगळ्यांनाच सगळे काही माहीत नसते...आता चंद्र🌙 कोणाकोणाला आवडत नाही हे तुमच्या आचार्यांपेक्षा मलाच माहीत आहे.😉
हा संवाद वाचून नक्कीच कोड्यात पडला असाल...चाणक्यांना ज्ञान देणारा हा कोण डुढ्ढाचार्य..आणि कसलं ते ज्ञान..कोण हा चंद्र? तर हा संवाद आहे चंद्रगुप्त मौर्याविषयीचा..विशाखादत्त लिखित मुद्राराक्षस या नाटकातला..
आजच्या काळात राजकीय विषयांवरील कलाकृती या नेहमीच लोकप्रिय ठरतात..यासाठी सिंहासन, सामना किंवा अगदी अलीकडील आजचा दिवस माझा यांसारख्या चित्रपटांची देखील उदाहरणे देता येतील..पण जवळपास हजार वर्षांपूर्वी..जेव्हा नायक-नायिकांची प्रणयप्रधान नाटके लोकप्रिय असताना नायिका नसलेलं आणि केवळ राजकीय शह-काटशहांनी रंगलेलं मुद्राराक्षस हे नाटक निश्चितच आपलं वेगळं स्थान निर्माण करतं..पण असं काय आहे नेमकं या नाटकात? चाणक्याच्या स्वभावाचे कोणते पैलू नाटकातून समोर येतात? जाणून घेण्यासाठी नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment