२४।०८।२०२३
सत्र २३७वे:
पुस्तक : India, Bharat and Pakistan
लेखक : जे साई दीपक
सादरकर्ते : शशांक कुंभारे
आज शब्दांगण मध्ये सादर होणारं पुस्तक म्हणजे जे. साई दीपक यांच्या तीन पुस्तकांच्या मालिकेतील दुसरं “इंडिया, भारत अँड पाकिस्तान”. भारताच्या इतिहासाचा वेगळ्या संदर्भातून मागोवा घेताना लेखक यामध्ये वसाहतवाद, भारतीय सभ्यतेची पाळंमुळं यांच्या अनुषंगाने 1905 ते 1924 या काळात घडलेल्या घटनांचं विश्लेषण करत जातात. आपल्या तर्कशुद्ध मांडणीसाठी प्रसिद्ध असलेले जे. साई दीपक आपल्या इतिहासावर प्रभाव पडणाऱ्या या आणि आधीच्या काळातील वेगवेगळ्या घडामोडींचा संदर्भ देत एक वेगळी बाजू समोर घेऊन येतात.
भारताच्या संदर्भातील कुठलीही घटना आपल्यासाठी महत्वाची असते तसंच आपल्या गौरवशाली इतिहासाचा नवीन पैलू समजून घेणंही तितकंच महत्वाचं ! ही मांडणी आपल्यासमोर आज शशांक कुंभारे करणार आहे. ती ऐकण्यासाठी, समजून घेण्यासाठी, त्यावर चर्चा करण्यासाठी आवर्जून ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment