Thursday, October 26, 2023

सत्र २३८ : गालिबला जाणून घेताना : मकरंद सावंत

३१।०८।२०२३

सत्र २३८वे:

विषय : गालिबला जाणून घेताना

सादरकर्ते : मकरंद सावंत



काव्यशास्त्रविनोदेन 

कालो गच्छति धीमताम् ।

व्यसनेन च मूर्खाणां, 

निद्रया कलहेन  वा  ।। 

बुद्धिमान माणसे काव्य, शास्त्र आणि साहित्य यांच्या अध्ययनात वा अध्यापनात आपला  वेळ  व्यतीत करण्यात धन्यता मानतात. तर मूर्ख माणसे वेगवेगळी  व्यसने करण्यात, वितंडवाद घालण्यात वा झोपेत..! संस्कृत सुभाषिते ही अशी अल्पाक्षरी पण बहुमूल्य व आशयघन काव्यासारखी. कवींची हीच तर खरी ताकद व खासियत. मग ते वर्डस्वर्थचे डॕफोडिल्स असो, फ्राॕस्टचे रोड नाॕट टेकन असो, साहिर अथवा अनेकानेक उर्दू शायरांची शायरी. उर्दू शायरी म्हटल्यावर  गा़लिबचा जि़क्र होणारच. 

जे शंभर नंबरी अस्सल कलावंत असतात  म्हणजे पुलं, आचार्य अत्रे, शंकर जयकिशन, लता मंगेशकर, साहिर लुधियानवी अश्यांच्याच नावे खऱ्या अथवा ऐकीव  दंतकथा पसरतात.  गा़लिब, मिर्जा़ गालिब़ ह्या दोन्ही नावांनी सर्वपरिचित शायराच्या नावेही अशा अनेक कथा पसरल्यात.  गा़लिब म्हटल्यावर आठवते,  गा़लिबची शायरी. दिल बहलाने के लिए  खयाल अच्छा है गालिब सारखे गा़लिबचेच शेर. आणि सुरैय्याचा मिर्जा़ गा़लिब चित्रपट हो सुरैय्यासाठी बघितलेला. गा़लिब हे नाव उर्दू  शायरीसाठी इतके अहम का ?त्याचे उत्तर यात मिळते. गा़लिबचा इंतकाल झाल्यानंतर  शे-सव्वाशे वर्षांनी गुलजारनी  दूरदर्शनसाठी केलेल्या व नासिरुद्दिनने गा़लिबची भूमिका केलेल्या मालिकेचे शीर्षकगीतच गालिब़ची महती सांगणारे. 

हैं और भी दुनिया में,

सुख़न-वर बहुत अच्छे।

कहते हैं कि 'ग़ालिब' का है 

अंदाज़-ए-बयाँ और ।।

गा़लिबच्या शायरीचे पहेलू  असे काय आहेत की दीडेकशे वर्षांनीसुध्दा त्या शायरीबाबत आपल्याला वाचावंसं  ऐकावंसं अन् त्याहूनही समजून घ्यावंसं वाटतंय.. 

याचसाठी अश्या सर्व शायरी प्रेमींनी नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...