१७।०८।२०२३
सत्र २३६वे:
विषय : कवितेतून जाणवलेल्या अरुणाताई
सादरकर्त्या : तेजस्विनी गांधी
नमस्कार !
डाॕक्टरचा व्यवसाय पुढली पिढी डाॕक्टर होऊन चालवते. अशी पितृव्यवसायाची परंपरा सर्वच क्षेत्रातील कलावंतांना वा कलांना लागू होत नाही. त्यातून साहित्यिकांचे तर खूप वेगळे असते. आणि कवी अथवा चिकित्सक - संशोधक यांचे तर त्याहून निराळे असते. मराठी साहित्यातील संत साहित्याच्या अभ्यासकांच्या, काव्यमंडळ चालवणाऱ्या कविच्या (रा. चिं. ढेरे) थोर परंपरा लाभलेल्या व्यक्ती, ज्या घरात भिंतीऐवजी पुस्तकेच पुस्तके असतात, अशा घरात जन्मलेल्या व्यक्ती, यांच्या हाताला सहसा साहित्याचे वेगळे बोट असते.
आपले कविप्रकृतीचे रंग व रस केसरीत कविता छापून आलेल्या शाळकरी वयातल्या अरुणाताईंनी दर्शविले. होय. अरुणा ढेरे.९२व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा, आपल्या वाङ्मयीन प्रेरणा, प्रतिभा, त्यांची बलस्थाने व मर्यादा याबाबत सजगपणे विचारशील असलेल्या, चिंतनशील, वैचारिक, लेखिका. कथा-काव्य तसेच संशोधनाची परंपरा राखत ६ काव्यसंग्रहांसह
चाळीसेक पुस्तकांची ग्रंथसंपदा नावे असणाऱ्या. आपल्या साहित्यातून वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करताना स्त्रीविषयक जाणीवा सतत जिवंत असलेल्या. वैचारिक लिहितानाही, परमेश्वराच्या करुणेचा दीप शब्दांतून येण्याचे मागणे आपल्या करुणाष्टकातून अरुणा ढेरे त्याच्याकडे मागतात.
अरुणाताईंच्या कवितांवर या गुरुवारी शब्दांगणचे सत्र घेतायत तळेगाव येथे राहणाऱ्या, साहित्याची अभिरूची जोपासणाऱ्या आणि आपल्या तरल कवितांमधून तसेच अभ्यासू वक्तृत्वामधून वेळोवेळी व्यक्त होणाऱ्या तेजस्विनी गांधी ! अरुणाताईंच्या रसाळ काव्याचं तितकंच रसपूर्ण विवेचन नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment