Friday, January 20, 2023

सत्र २०५ :घटना : खटला : नाट्य - एक शोधयात्रा (प्रकट मुलाखत) : ॲड. क्रांती पाटणकर

१२।०१।२०२३

सत्र २०५वे:

विषय : घटना : खटला : नाट्य - एक शोधयात्रा (प्रकट मुलाखत)

सादरकर्त्या : ॲड. क्रांती पाटणकर

मुलाखतकार : मुकुंद करकरे



चेहरे में हैं आईंना के आईंने में चेहरा
मालूम नही कौन किसे देख रहा हैं

असा एक शेर आहे. हळुवार, मृदू भावनांमधून हा शेर लिहिला गेला असला तरी आज हा शेर आठवण्याचं कारण म्हणजे आजचं शब्दांगण चं सत्र. नाटक आणि सिनेमा या कलाकृती आपल्या जीवनातील घटनांवर आधारित असतात की आपलं जीवन त्यांच्यानुसार बनत जातं ? प्रतिबिंब कोणतं आणि प्रत्यक्ष प्रतिमा कोणती? आजचं सत्र ऍडव्होकेट क्रांती पाटणकर घेतायत. प्रत्यक्ष घडलेल्या घटना / व्यक्ती आणि त्यांच्यावर आधारित नाटक सिनेमा असा आजचा विषय. विषय आणि वक्ता दोन्ही ताकदवान. क्रांती पाटणकरांच्या अनुभवाचा आणि रसिकतेचा प्रत्यय आजच्या सत्रातून येईल.
त्यांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलतं करणार आहेत मुकुंद करकरे. करकरे सर भाग्यवान, कारण त्यांना अनेक रसज्ञांचा सहवास लाभला. लाभतोय. त्यांचे इन्टरेस्टस बहुपेडी आहेत आणि त्यांना असलेली विविध विषयांमधली माहीती आपल्याला स्तिमित करते. विषय, वक्ता दोन्ही मनोज्ञ असल्याने, आजचं सत्र चुकवू नये असंच.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...