Friday, January 20, 2023

सत्र २०२ : करिअर की कॅरिअर : गिरीश टिळक

२२।१२।२०२२

सत्र २०२वे:

विषय : करिअर की कॅरिअर

सादरकर्ते : हेडहंटर गिरीश टिळक



शब्दांगणचं आजचं सत्र सुद्धा वेगळं. *हेडहंटर गिरीश टिळक* आजचं सत्र घेतायत. *करिअर की कॅरियर* असा आजचा विषय. खूप वेळा आपण मला करिअर घडवायचे आहे असं नुसतं ऐकतो. पण प्रत्यक्षात करिअर म्हणजे नक्की काय? तिथपर्यंत पोचायचं कसं ? असा प्रश्न आपल्याला कायमच सतावत राहतो. आपण विद्यार्थी असाल किंवा पालक किंवा अगदी शिक्षक सुद्धा आपल्या सगळ्यांनाच हे सत्र मार्गदर्शक ठरू शकेल.

आपल्या मनमोकळ्या स्वभावाची , दिलखुलास गप्पांसाठी प्रसिद्ध असलेले हेडहंटर गिरीश टिळक आजचं सत्र घेत आहेत. मोठमोठ्या कंपन्यांसाठी मोठमोठ्या पदांवर माणसं नेमण्याचा त्यांचा व्यवसाय. या महत्वाकांक्षी पदांसाठी माणसं शोधताना ते नक्की काय विचार करत असतील? या मोठेपणाची बीजं आपल्याला आपल्यात शोधता येतील का? आजच्या सत्राच्या निमित्ताने अशा काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूयात.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...