२९।१२।२०२२
सत्र २०३वे:
विषय : माझे वाचन; माझे लेखन : कला, समाज आणि राजकारण यातील मुक्त भ्रमंती
सादरकर्ते : प्रा. अविनाश कोल्हे
आजचं शब्दांगण चं सत्र अतिशय वेगळं. *श्री. अविनाश कोल्हे* आजचं सत्र घेतायत. फार कमी वेळा एकच व्यक्ती रस आणि कौशल्य या बाबतीत अनेक क्षेत्रात सरस असते. कोल्हे सर रुपारेलमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानासुद्धा इंग्रजी नाटक, सिनेमा यांचे रसग्रहण आपल्या लिखाणातून करत होते. भारत चीन संबंध - नेहरू गांधी यांच्यासारखे नेते - ते अगदी फ्रेंच नाटककार यास्मिना रझा अशा विविधांगी विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र किंवा पॉलिटी सारखा साधारणतः: रुक्ष विषय शिकवत असतानाही आपली रसिकता जपलेले कादंबरीकार कोल्हे सर *'माझे वाचन: माझे लेखन'* या आपल्या सत्रातून त्यांच्या लेखन प्रवासाबाबत बोलणार आहेत. प्रत्यक्ष लेखक आपल्या भेटीला हा कायमच आनंददायक अनुभव असतो. आजही हा वेगळा अनुभव घेण्यासाठी जरूर भेटूयात.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment