०५।०१।२०२३
सत्र २०४वे:
विषय : कारुण्यसिंधू (ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ प्रथम स्मृतिदिन विशेष सत्र)
सादरकर्त्या : सौ. वृंदा कुलकर्णी
सुरेश भट म्हणतात,
माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !
आपल्या जवळच्या माणसांनी दिलेल्या जखमांवर मात करत, परिस्थितीला शरण जाणे नाकारत वैयक्तिक आयुष्यात काही तरी मोठे करून दाखवणाऱ्या कर्तृत्ववान माणसांची संख्या कदाचित कमी नसेल. पण जगात फार कमी माणसे अशी असतील की जी नियतीने आखलेल्या खडतर मार्गावरून चालत असताना सुद्धा आपल्या हृदयातल्या अथांग कारुण्याचा झरा जगासाठी मोकळा करू शकतात. अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदमश्री सिंधुताई सपकाळांचे आयुष्य म्हणून प्रेरणादायी. त्यांचे चरित्र आज वृंदा कुलकर्णी मांडणार आहेत.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment