०६।१०।२०२२
सत्र १९१ वे:
विषय : मूलकणांचे अंतरंग ( पदार्थविज्ञानाच्या विश्वाची सफर )
सादरकर्त्या : राधिका विंझे
नमस्कार मंडळी,
जुलै २०१२ मधे जिनिव्हा येथे LHC प्रयोगात Higgs Boson (देवकण) सापडला आणि या विश्वाच्या उत्पत्तीविषयीच्या संशोधनातील एक महत्वाचा धागा गवसला. हिग्स बोसॉन मुळे विश्वाची संरचना मांडणाऱ्या मुलकणांच्या आकृतीस (Standard Model of Particle Physics) पूर्णत्व आले, परंतु आजही विश्वाविषयी काही कोड्यांची उकल झालेली नाही. आज ज्ञात असलेली ही मुलकणांची आकृती हे सैद्धांतिक व प्रायोगिक भौतिकशास्त्रातील खूप मोठे यश मानले जाते. या मूलकणांच्या आकृती पर्यंतची वाटचाल, हिग्ज बोसॉन विषयी संशोधन व अजूनही काही अनुत्तरित प्रश्नांचा आढावा म्हणजे शब्दांगणचे आजचे सत्र! ह्याच विषयात Ph.D. करत असलेली राधिका विंझे हे सत्र घेत आहे! वेगळ्या विषयावर प्रकाश टाकणारे हे सत्र नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment