Saturday, September 10, 2022

सत्र १८५ : Savarkar : A Contested Legacy - विक्रम संपथ : मुकुल आव्हाड

१८।०८।२०२२

सत्र १८५ वे:

पुस्तक : Savarkar : A Contested Legacy

लेखक : विक्रम संपथ

सादरकर्ते : मुकुल आव्हाड



जेव्हा लोकमानस दुभंगलेलं असतं त्यावेळेस कोणत्याही महत्वाच्या नेत्याच्या जीवन आणि शिकवणीविषयी वादंग आपसूकच तयार होतात. त्याची कारणं खरंतर नैसर्गिक अशीच. पण त्यातही आपण आपल्या फूटपट्ट्या घेऊन त्यांचे मूल्यमापन करायला लागलो कि हा प्रश्न अधिकच गंभीर होतो. सावरकर हा विषय तर सध्याच्या काळात अधिकच पेटलेला आहे. अशा वेळेस राजकारणाच्या पलीकडे जाऊन विक्रम संपथयांनी सावरकरांवर लिहिलेल्या पुस्तकावर आज मुकुल आव्हाड बोलणार आहे. याच पुस्तकाचा पहिला भाग एका अर्थाने म्हटला तर आपल्या सगळ्यांना भावणारा होता. अर्थात सावरकरांच्या जीवनपटात पहिला भाग हा निःसंशय अतिशय तेजाने भारलेला. जीवनातील दुसऱ्या भागाने मुत्त्सद्देगिरीने धाडसावर कुरघोडी केलेली. या मुत्त्सद्देगिरीवर मतमतांतरे आणि टोकाचे मतभेद. मुकुल आज 'सावरकर: कॉंटेस्टेड लीगसी' या पुस्तकावर बोलणार आहे. विक्रम संपथ यांचे पहिले पुस्तक डोक्यावर घेतलेल्या अनेकांनी त्यांच्या दुसऱ्या पुस्तकाबद्दल सोयीस्कर मौन बाळगले होते. म्हणूनच आजच्या सत्राबद्दल उत्सुकता. आपल्या विषयाला इतरत्र अभ्यासाची जोड देण्यात मुकुल यशस्वी झाला आहे. त्यामुळेच आजच्या सत्राविषयी अतिशय उत्सुकता आहे. 

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...