Saturday, September 10, 2022

सत्र १८२ : एक पूर्ण नीला : प्रज्ञा गोखले

२१।०७।२०२२

सत्र १८२ वे:

विषय : एक पूर्ण नीला  ( कर्तबगार IAS अधिकारी, नीला सत्यनारायण यांच्या साहित्याचा वेध )

सादरकर्त्या : प्रज्ञा गोखले



मंडळी, आजचं शब्दांगण आदर्श वाटावा असं व्यक्तित्व आणि करिअर असणाऱ्या नीला सत्यनारायण यांच्यावर होतंय. प्रशासकीय सेवेत कार्यरत असूनदेखील आपल्यातील साहित्यिक जिवंत ठेवणार्‍या नीला सत्यनारायण यांनी कादंबरी, कविता, कथा,लघुकथा अशा निरनिराळ्या साहित्यप्रकारांमध्ये लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र टाईम्स या दैनिकातून त्या सगुण निर्गुण या सदरातून चिंतनशील लेखनदेखील करत होत्या. २०२० च्या कोरोना लाटेमध्ये दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. मात्र निधनानंतर त्यांचे लॉकडाऊन डायरीज हे आपल्या क्वॉरंटाईनच्या अनुभवाविषयी सांगणारे पुस्तकदेखील प्रकाशित झाले. अशा शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तके आणि लेखनाशी असलेला संबंध जपणार्‍या नीला सत्यनारायण यांच्या समग्र साहित्याचा या सत्रात वेध घेतला त्यांचा काही काळ प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या प्रज्ञा गोखले यांनी.. त्यामुळे एका चिंतनशील मात्र सहजसोप्या साहित्याची सफर घडवून आणणारे हे सत्र अजिबात चुकवू नका.


हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !



No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...