Saturday, September 10, 2022

सत्र १८३ : हटके भटके - निरंजन घाटे : वृंदा कुलकर्णी (पूर्वार्ध सत्र)

२८।०७।२०२२

सत्र १८३वे: (पूर्वार्ध सत्र)

पुस्तक : हटके भटके

लेखक : निरंजन घाटे

सादरकर्त्या : वृंदा कुलकर्णी



 सिल्क रूट अर्थात प्राचीन रेशीम मार्गाने प्रवास करत भारतात प्रवेश करणारी एक कलंदर स्त्री..

* हनुमंताने ज्या मार्गाने द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्या मार्गाचा मागोवा घेणारी एक धडपडी, धाडसी स्त्री..

* नेपोलियनच्या अखेरच्या दिवसांतल्या घडामोडींचा मागोवा घेणारी एक अभ्यासक स्त्री..

* कामशास्त्र या विषयाचा प्रचंड अभ्यास असणारा आणि त्यावर ग्रंथ लिहिणारा, मक्का-मदिनेत जाऊन आलेला एक अवलिया विद्वान भटक्या..

* उंट आणि त्यांची जीवनशैली या विषयाच्या अभ्यासासाठी आपलं अवघं आयुष्य वेचणारी एक विदुषी..

* भारतातल्या मॉन्सून आणि त्याच्या प्रवासाचा बारकाईने अभ्यास करणारा एक अभ्यासक..

यातली एकही घटना आणि पात्र काल्पनिक किंवा कपोलकल्पित नाही की मार्वल/डीसी युनिव्हर्स मधली सुपर ह्युमन-सुपर हिरो नाहीत. ही सगळी आपल्यासारखीच खरीखुरी हाडामासाची सामान्य माणसं आहेत. अशा या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि धाडसाने प्रेरित असलेल्या आणि वर्षानुवर्षे सतत आपल्या लक्ष्याच्या दिशने, ध्येयाच्या दिशेने नजर खिळवून ठेवलेल्या अवलिया, कलंदर, भटक्या अभ्यासकांच्या चरित्रांचा प्रवास आज आपल्यासमोर मांडणार आहेत आपल्या वृंदाताई अर्थात ॲडव्होकेट वृंदा कुलकर्णी.

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...