०३।०२।२०२२
सत्र १५८वे:
विषय: कल पक्का
Procrastination : A Delaying Tactics
सादरकर्ते : केदार पटवर्धन
चालढकल हा खरंतर अगदी तुमचा माझाच नव्हे तर पूर्ण समाजाचाच प्रश्न होत चाललाय... कल करे सो आज कर आज करे सो अब असं म्हणणारे दिवसेंदिवस विरळ होत चाललेत म्हणा ना! अर्थात यातुन बाहेर पडण्याची इच्छा असणारे सुद्धा कमी नाहीत आणि इच्छा असूनही हा बदलही नंतरच करू असं म्हणणारे ही आपणच ! १ जानेवारीचे बहुसंख्य संकल्प आत्ता पर्यंत बासनात गुंडाळले गेलेले असतात. स्वाभाविकत: बुडाखाली आग लागल्याखेरीज अनेक जण कामाला लागतच नाहीत. या घटनेलाच procrastination म्हणतात. त्याचे शिकार असलेले आपल्यापैकी अनेकजण .
' Attitude matters' या शीर्षकाखाली व्यक्तिमत्व विकासावर सत्रे घेणारा केदार पटवर्धन आजचं सत्र घेतोय. बहुश्रुत व्यक्तिमत्व, चोखंदळ रसिक आणि नरम विनोदी हजरजबाबी पणा करता प्रसिद्ध असलेला केदार हे सत्र घेतोय, ऐकायला नक्की या.आजचे सत्र बहुभाषिक म्हणजे इंग्लिश / हिंदी आणि मराठीत होणार आहे. शब्दांगणचे हे अत्यंत वेगळे सत्र चुकवू नका.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
No comments:
Post a Comment