१७।०२।२०२२
सत्र १६०वे:
विषय: भारत- चीन संबंधांचे भवितव्य
भविष्याचा भू-राजकीय, सामरिक आणि आर्थिक आढावा
सादरकर्ते : श्रीराम कुंटे
आपण आपले शेजारी निवडू शकत नाही, जे आहेत त्यांना स्वीकारून त्यानुसार आपली रणनीती आखायला लागते. भारताला चीन आणि पाकिस्तान सारखे शेजारी मिळाले. एका अर्थाने त्यांच्या बरोबरच्या संबंधांवर आपलाही विकास अवलंबून आहे. विशेषतः चीनबरोबरचे आपले संबंध अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. एका बाजूला सीमाप्रश्नावर चीन भारताविषयी अत्यंत आक्रमक भूमिका घेतो, पाकिस्तानमध्ये एक कळीची (की कळलाव्याची) भूमिका निभावतो आणि तरीही पर्यावरण सारख्या विषयांवर भारत आणि चीन यांना विकसनशील देशांचे विकसित देशांविरोधात एकत्र यावे लागते. BRICS सारख्या संघटनेत भारत आणि चीन एकत्र काम करतात आणि QUAD सारख्या संस्थेत भारत चीन विरुद्ध आघाडी उघडतो. भारताच्या दृष्टीने दक्षिण आशियाच्या पाण्याच्या साठ्यांवर कब्जा असलेला चीन एक डोकेदुखी जशी आहे तशीच अपरिहार्यताही. हे सगळे लिहिण्याचे कारण म्हणजे शब्दांगण चे आपले आजचे सत्र याच अत्यंत ज्वलंत विषयावर आहे. भारत आणि चीन यांच्या संबंधांच्या भवितव्यावर, श्रीराम कुंटे हे सत्र घेतायत. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांच्या युट्युब वाहिनीमधून आपल्याला त्यांचा परिचय असेलच. चीनबरोबरच्या आपल्या भुराजकीय, सामरिक आणि आर्थिक संबंधांचा आढावा ते घेणार आहेत, हे अत्यंत महत्वाच्या विषयावरचे सत्र नक्की ऐका.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
No comments:
Post a Comment