Wednesday, July 5, 2023

सत्र २२९ : कथा साहसवीराची - फास्टर फेणे : शौनक पिंपुटकर

२९।०६।२०२३

सत्र २२९वे:

विषय : कथा साहसवीराची - फास्टर फेणे

सादरकर्ते : शौनक पिंपुटकर



नमस्कार !
तुम्हाला सर्वांना आजच्या आषाढी एकादशीनिमित्ताने शुभेच्छा !
कसं आहे, बदलत्या काळानुरुप जसे सिनेनायक-नायिका बदलतात तसेच त्या त्या काळातील, कथांमधील साहसवीर/नायकही. काल गोट्या-चिंगीची पुस्तके वाचणाऱ्या पिढीच्या नातवंडांना बोक्या-चिंटू-हॕरी पाॕटर हे किंडल नि इ-बुकवर वाचायला आवडू लागलेत.पण त्यांच्या पालकांना त्यांचा हिरो कोण होता विचारले तर ते निःसंशयपणे म्हणतील - *ट्टाॕक!* ... हां...! म्हणजे *फाफे म्हणजे फास्टर फेणे, म्हणजेच बन्या उर्फ बनेश फेणे !*

मराठी बाल-कुमारसाहित्यात व बाल-कुमारवाचकांत एक अढळपद प्राप्त केलेला नायक म्हणजे फा.फे.
पुस्तके , दूरदर्शन-मालिका, चित्रपट, किंडल, इ-बुक असा सगळा प्रवास केल्यानंतरही पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटत राहणारा फाफे.
फाफे म्हटल्यावर काय आठवतं ?
आठवते...
*फाफे म्हणजे तो चौकड्यांचा शर्ट, वाळकुड्या तंगड्या, कुठूनही कितीही उंचावरून उडी मारणे, भन्नाट वेगाने सायकलिंग, धावपळ हे व असल्या अनेकानेक बारीकसारीक गंमतीजमती ..शिवाय, संकटमालिका नि त्यावर युक्तीप्रयुक्तीने मात ...*

अश्या सगळ्या सगळ्या करामती वाचून बालवाचकांचे मन रमले नसते तरच नवल!
थोडक्यात, वाचकांच्या दृष्टीने बोलायचे तर, वाचनाच्या रस्त्यावरचे, मोक्याचे वळण म्हणजे *फास्टर फेणे!* जे एकदा मागे पडले तरी पुन्हा पुन्हा तिथे जावेसे वाटतेच वाटते..!

चला तर मग येताय ना ? आजच्या शब्दांगणच्या सत्राला. सादर करतोय आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांवर/विषयांवर सत्रे घेतलेला विविधांगी वाचनात रस असलेला *हॕरी पाॕटर- चिंटू- बोक्याच्या* जमान्यातही चक्क फाफे वाचणारा एक युवा वाचक- *शौनक पिंपुटकर.*

फास्टर फेणे हा ८० - ९० च्या दशकातल्या किशोरवयीन मुला- मुलींचा चा हिरो... नैतिक साहसाने आणि आदर्शवादाने भरलेला आणि भारलेला. शब्दांगणच्या आजच्या सत्राचं वैशिष्ट्य हे की ते मुलांबरोबर ऐकावं आणि नंतर त्यावर गप्पा ही माराव्या .... त्यानिमित्ताने तुमचं बालपण ज्या ज्या गोष्टींनी रंगवलं त्या त्या गोष्टींना उजाळा द्या. ते दिवस पुन्हा आठवण्यासाठी आजचं सत्र नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...