Friday, June 9, 2023

सत्र २२६ : ललित गजानन : चंद्रशेखर टिळक

०८।०६।२०२३

सत्र २२६वे:

पुस्तक : ललित गजानन

सादरकर्ते : चंद्रशेखर टिळक



दासगणू महाराजांनी लिहिलेली गजानन महाराजांची पोथी हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान! चांगल्या भक्तियोगाला रसाळ लेखनाची गेयतेची किंवा दृष्टांताची जोड असते! पण बऱ्याचदा साधक मात्र अध्यात्माला रसपूर्णतेचं वावडं असल्यासारखं निव्वळ श्रद्धा म्ह्णून वाचत राहतो. त्याच वेळेस एक अर्थतज्ञ हा रूढ अर्थाने कोरड्या पण सामाजिक जीवनाला आवश्यक अशा आर्थिक प्रश्नांची उकल गांभीर्याने करत असतो.

चन्द्रशेखर टिळक ही चौकट लीलया मोडतात. सिद्ध हस्त वक्ता असलेले टिळक वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके घेऊन आपल्यासमोर येत आहेत. गजानन ललित या पुस्तकावरचे सत्र म्हणूनच अनोखे!

विषय जिव्हाळ्याचा पण नाविन्यपूर्ण आणि त्याचवेळेस श्रद्धेय. वक्ता सिद्धहस्त! नक्की ऐका !

हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !


No comments:

Post a Comment

सत्र २६३ : निर्णयशास्त्र : श्री. मनिष वैशंपायन

  २५ ।०८।२०२४ - राष्ट्रीय सौर ०३ भाद्रपद १९४६ सत्र २६३वे:  विषय : निर्णयशास्त्र सादरकर्ते : श्री. मनिष वैशंपायन      आपलं आयुष्य घडवण्याचं क...