०१।१२।२०२२
सत्र १९९ वे:
पुस्तक : चंदेरी सृष्टी सोनेरी गोष्टी
सादरकर्ते : प्रकाश चांदे (प्रकट मुलाखत)
मुलाखतकार : मुकुंद करकरे
आजचं सत्र नेहमीच्या धाटणीपेक्षा वेगळं. बॉलीवूड आणि एकंदरच चित्रपटसृष्टी च्या संदर्भात लख-लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया सारखं गाणं आपल्या मनात रुंजी घालत असतंच आणि त्यांच्या सृजनात्मक दुनियेतल्या - या चंदेरी दुनियेतल्या किस्से आणि कहाण्या ऐकण्यामध्ये आपल्याला रस असतो. ही सगळी सृजनशील मंडळी, कसा विचार करतात, कसं जगतात याचं कुतूहल सुद्धा असतं. या संबंधित रंजक किस्से आणि कहाण्या ऐकण्यासाठी आजचे शब्दांगण मजेदार ठरेल. आजचं सत्र सादरीकरण म्हणून फॉरमॅटच्या दृष्टीने सुद्धा वेगळे ....
'चंदेरी सृष्टी - सोनेरी गोष्टी' या पुस्तकाचे लेखक प्रकाश चांदे यांची मुलाखत चोखंदळ रसिक वाचक मुकुंद करकरे घेणार आहेत. करमणूक प्रधान आणि सृजनशील अशा चंदेरी दुनियेची ही सफर प्रत्यक्ष नक्की अनुभवा..!
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment