१९।०५।२०२२
सत्र १७३ वे:
पुस्तक : मुक्काम
लेखिका : गौरी देशपांडे
सादरकर्त्या : पालवी मोघे
स्त्रीपुरुष संबंधांचं संपूर्ण आकलन कुणाला झालंय? आणि तरीही या विषयावर काही वाचायचे किंवा लिहायचे आकर्षण सुद्धा कुणाला चुकलंय?
'तेरी राहों मे बारहा रुककर, हमने अपनाही इंतजार किया! असं सहजच गुलझार लिहून जातो. स्त्री पुरुष संबंधांमध्ये नात्यांचे अर्थ लावताना, त्यात नीती अनीती चे धागे शोधताना, रूढ सामाजिक संकेत पाळताना किंवा ते तोडताना आणि त्याबद्दल वाचताना सुद्धा आपल्या स्वतःलाही नकळत आपण आपलाच धांडोळा घेऊ लागतो. आपल्या नात्यांची वीण घट्ट करू पाहतो... हे सगळं आठवायचं कारण म्हणजे आजचं शब्दांगणचं सत्र... गौरी देशपांडे लिखित 'मुक्काम' पुस्तकावर पालवी मोघे -लखोटे आजचे सत्र घेतेय. तथाकथित नैतिकतेला, नातेसंकेतांना धक्के देत, जगण्याची नैसर्गिक लय साधत, भल्याबुर्या अनुभवांना, सहज सामोरं जात, स्त्री-पुरुषसंबधांचे नवनवे पैलू उलगडत जाणारं हे पुस्तक वाहत्या, उसळत्या जीवनाला सदैव सन्मुख राहण्याचा स्वभाव असलेल्या पालवीला आणि किंबहुना विचार स्वातंत्र्य अनुभवणाऱ्या सर्वच तरुणींना / महिलांना आवडले नाही तरंच नवल... नक्की ऐका !
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment