०७।०७।२०२२
सत्र १८० वे:
विषय : पुरुषोत्तम
सादरकर्ते : तक्षिल खानविलकर, सुमेध समर्थ, मल्हार शितोळे (टीम प्रयोगशाळा)
मंडळी ,
' आपल्या प्रतिभा साधनेत व्यत्यय तर आणला नाही ना?
' रत्नागिरीतल्या समस्त म्हशी तूर्तास गाभण का रे झम्प्या? '
' यमीपेक्षा सहापट गोरी '
ही आणि अशी असंख्य वाक्ये आपल्या पैकी अनेकांना आठवत असतात, वेळोवेळी त्यांचे दाखले द्यावेत अशी स्थिती सातत्याने येत असते... पुलंनी अजरामर केलेली ही व्यक्तिचित्रे आपल्यापैकी अनेकांच्या काळजात घर करून आहेत. अर्थात त्यात मुख्य श्रेय त्यांनीच केलेल्या कथाकथनाचे .... अजूनही सर्वच पिढ्यांवर त्यांचे सादरीकरण गारुड करून आहे. पण विनोद हा स्वभावधर्म असलेल्या पुलंचे वैचारिक साहित्य मात्र सगळ्यांना माहित असतेच असे नाही. या साहित्यावर यंदाचं शब्दांगणचं सत्र घेणार आहे टीम प्रयोगशाळाची त्रिमूर्ती. पुलंच्या वैचारिक साहित्याची ताकद अफाट आहे, तिचा अनुभव घेण्यासाठी तक्षिल खानविलकर, मल्हार शितोळे, सुमेध समर्थ यांच्या या सत्राला नक्की उपस्थित राहा.
आणि सर्वात महत्वाचे : हे सत्र युट्युब वर शब्दांगण सत्राच्या वेळे व्यतिरिक्त पूर्णांशाने उपलब्ध नसेल.

No comments:
Post a Comment