३०।०६।२०२२
सत्र १७९ वे:
विषय : आज्ञापत्रांचे अंतरंग
सादरकर्त्या : डॉ. प्राची दामले
'आज्ञापत्रांचे अंतरंग' यावर शब्दांगणचं सत्र आज डॉ. प्राची दामले घेतायत. या सत्रासाठी आजच्या पेक्षा अधिक योग्य दिवस मिळाला असता का? असा प्रश्न आपल्याला पडावा. राज्यकर्त्यांची कर्तव्ये आणि सूक्ष्म विचार यातून सहज अधोरेखित व्हावीत. मंडळी, महाराष्ट्र इतिहासावर आत्यंतिक प्रेम करतो, त्यातून योग्य ते धडे घेतो का हा खरे तर प्रश्नच. आज्ञापत्रांचे अंतरंग मधून एक आदर्श राज्यकर्ता समोर येतो एव्हढेच नव्हे तर तत्कालीन समाज जीवनावर सुद्धा त्यातून प्रकाश पडतो. आजचे सत्र चुकवू नये असेच. आज पाऊस आहेच परंतु खऱ्या रसिक श्रोत्याला पाऊस आडवा येत नाही. आणि मुंबईकराला तर नाहीच नाही.
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment