०३।०३।२०२२
सत्र १६३ वे:
पुस्तक: The War that made R&AW
लेखक: संदीप साकेत, अनुषा नंदकुमार
सादरकर्ते : केतन लोवलेकर
भारतवर्षाच्या इतिहासात आर्य चाणक्याच्या काळापासून ते थेट शिवाजी महाराजांच्या दरबारी असलेल्या बहिर्जी नाईकांपर्यंत वेळोवेळी गुप्तहेर आणि गुप्तहेर खात्यांचे उल्लेख आढळतात. इतिहासातील कित्येक युद्धे केवळ गुप्तहेर खात्याने पुरवलेल्या अचूक माहितीपायी आणि त्यांच्या प्रभावी कामगिरीमुळे जिंकली गेलेली आहेत. भारताचे गुप्तहेर खाते RA & W किंवा रॉ ने देखील अनेक युद्धात विस्मयकारक कामगिरी बजावून भारताच्या अनेक विजयांत मोलाची कामगिरी बजावलेली आहे. अशा या रॉ च्या जन्माची आणि त्यांनी युद्धात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाची गाथा म्हणजे हे पुस्तक. आणि सादरकर्ते आहेत श्री केतन लोवलेकर.
सत्र ऐकण्यासाठी खालील युट्युब दुव्यावर टिचकी मारा.
No comments:
Post a Comment