१६।०६।२०२२
सत्र १७७ वे:
पुस्तक : सृजनाच्या नव्या वाटा
लेखिका : रेणू दांडेकर
सादरकर्त्या : रिद्धी करकरे
शिक्षण हा कुठल्याही देशाच्या / समाजाच्या दृष्टीने महत्वाचा विषय. पश्चिमेकडे प्लेटो पासून ते आपल्याकडे चाणक्यापर्यंत प्रत्येकानेच शिक्षण हे माणूस घडवण्यासाठी महत्वाचे मानले. आजही काहींना आपल्याला हवी तशीच नवी पिढी घडवण्याची इच्छा आहे. जणू मुले म्हणजे काही प्रॉडक्टच आहे... अशा वेळेस काही शाळा मात्र मुळातुन वेगळा दृष्टिकोन ठेवून मुलांच्या व्यक्तित्वाचं विकसन कसं होईल यावर प्रयोग करतायत... आजचं शब्दांगणचं सत्र रेणू दांडेकरांच्या सृजनाच्या नव्या वाटा यावर रिद्धी करकरे घेतेय. नर्म पण मार्मिक बोलण्याची हातोटी असलेली रिद्धी या विषयावर काय बोलणार? सृजनाच्या नक्की कोणत्या नव्या वाटा आपल्यासमोर उलगडल्या जातील याची उत्सुकता आहेच..
हे सत्र ऐकण्यासाठी खालील दुव्यावर टिचकी मारा !

No comments:
Post a Comment